शेवटी १९ तारखेच्या
दुपारी कर्नाटक राज्याचे नव निर्वाचित मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांच्या राजीनाम्या
नंतर कर्नाटकी नाटकाचा पहिला अंक संपला. १५ मे च्या संध्याकाळी काहीसा अपेक्षित
असलेला त्रिशंकू विधानसभेचा निकाल आला. भा.ज.प. ला १०४ जागा मिळवून सगळ्यात मोठा
पक्ष, २ नंबर वर कॉंग्रेस ७८, तर जनता दल सेक्युलर या पक्षाला ३७ जागा मिळाल्या.
पण पूर्ण बहुमताचा आकडा १११ असल्या मुळे भा.ज.प. ला ७ जागा कमी पडत होत्या. पण
संध्याकाळ पर्यंत कॉंग्रेसने “जदसे” मुख्यमंत्री पदाचे आमिष दाखवत स्वत:च्या
खेम्यात ओढले आणि नवीन “नाटक” सुरु झाले. कोणी याला “राजकारण” म्हणते कोणी
“घोडाबाजार”.
यात पहिले “खलनायक”
ठरले ते कर्नाटकचे राज्यपाल “वजुभाई”. कारण त्यांनी कॉंग्रस-जद्से यांच्या
निवडणुकी नंतर झालेल्या युतीला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित न करता, ज्या
पक्षाला पूर्ण बहुमत नाही त्या भा.ज.प. ला आमंत्रित तर केलेच पण त्यांना १५
दिवसांचा कालावधी पण दिला. हा पूर्णपणे “राजकारण प्रेरित” निर्णय होता यात काही
शंका नाही.
पण त्या नंतर झालेला
घटनाक्रम सर्वसामान्य भारतीय जनता यांची मती गुंग करणारा होता. भारतीय जनतेचा
“भारतीय राजकारणात” असलेल्या “नैतिकतेचा” संभ्रम दूर करणारा होता यात शंका नाही.
सर्वसामान्य भ.ज.प. च्या मतदाराला पण नेतांचे वागणे आवडले नसेलच. पण तरी भा.ज.प.
असे का वागली??
याचे सरळ कारण हे आहे
कि भा.ज.प. नेतृत्वामधील काही जणांना जदसे च्या कुमारस्वामी यांच्या पेक्षा
देवेगौडा यांच्यावर जास्त विश्वास होता. निकालाच्या दिवशी कुणी मराठी वार्तापत्र
वाहिन्या वरील निकाला वरील चर्चासत्र पहिले असतील तर त्यात भा.ज.प.चे प्रवक्ते सरळ
सरळ जदसे ची मत आपल्या मतांमध्ये मिसळून आमचेच सरकार येणार या विश्वासावर होती.
याला कारण होते ते निवडणुकी काळात झालेल्या प्रचारसभांमध्ये जद्सेच्या नेते
कॉंग्रेसविरुद्ध जास्त आक्रमक होते. याच प्रचार काळात पंतप्रधान मोदी यांनी
देवेगौडा यांच्या बद्दल “गौरवउद्गार” काढून “मित्रत्वाचा खुंटा” अधिक बळकट
करण्याचा प्रयत्न पण केला होता. असे सगळे “चांगले” होत असतांना “हवा” नेमकी कशी
काय फिरली?
तर याचे खरे कारण हे
कि, मागील काही निवडणुकांचा इतिहास लक्षात घेता जदसे नेतृत्वाला आपण पहिल्या किंवा
दुसर्या क्रमांकावर राहू आणि भा.ज.प. दुसर्या किंवा तिसर्या क्रमांकावर राहील अशी
आशा होती. पण जसे जसे निकाल लागून चित्र स्पष्ट व्हायला लागले तसे तसे “जदसे” च्या
नेतृत्वाचा धीर सुटायला लागला. याला कारण पण तसेच होते, कारण जदसे हा पहिल्या आणि
दुसर्या नाही तर कर्नाटकी मतदाराने त्यांना फक्त ३७ जागा देत सरळ सरळ तिसर्या
क्रमांकावर फेकले होते आणि त्याच्या अपेक्षे विरहीत भा.ज.प. ४० वरून सरळ सरळ १०४
वर जाऊन पोहचला होता. म्हणजे या निवडणुकीत सरळ सरळ जदसे पक्षाने “माती” खाल्ली आणि
इथेच गफलत झाली. जी अवस्था “शिवसेनेची” महाराष्ट्रात झाली, तीच अवस्था जदसेची कर्नाटकात.
कारण समजा आता ते भा.ज.प. सोबत जाऊन सरकारमध्ये सामील जरी झाले असते तरी त्यांना
हवी ती “खाती” नक्कीच हातात आली नसती. थोडक्यात भा.ज.प. सोबत जातांना त्याची “बर्गेरिंग
पावर” वापरता येणार नव्हती. यात भा.ज.प. १०० च्या वरती जागा गेल्यावर थोडा शिथिल
पडला पण १०४ वर काटा जेव्हा अडला तेव्हा जागा झाला. पण तो पर्यंत उशीर झाला होता.
कॉंग्रेस जी ७८ आमदार
निवडून आणत दुसर्या क्रमांकावर आली तिच्या करता हि परिस्थिती थोडक्यात “वीन-वीन”
अशीच झाली आणि त्या परिस्थितीचा पूर्ण फायदा कॉंग्रेसच्या नेतृत्वाने उचलला. मनाने
“विरोधी पक्षात” बसायची तयारी करत असलेल्या या पक्षाच्या समोर अनपेक्षित पणे “सत्तेचे
भरलेले ताट” समोर आले. आता भा.ज.प. सोबत जातांना नक्की काय मागायचे? याच्या
विचारात असलेल्या जद्से च्या कुमारस्वामी यांना सरळ सरळ “मुख्यमंत्री” बनण्याचे “आमिष”
देऊन सरळ सरळ खिशात टाकले. महाराष्ट्रातील निवडणुकी नंतर राजकीय नैतिकता आणि
सुचीतेपाई “शिवसेना” कॉंग्रेस-राष्ट्रवादी
सोबत जाण्यास कचरली, मुग गिळून आणि “राजीनामे” खिशात ठेऊन सरकार मध्ये सामील झाली,
सोबतच रोज भा.ज.प. ला झोडपायचा कार्यक्रम सुरु केला, पण याचा नक्की फायदा कुणाला
होणार हे येणारा काळ ठरवेलच. पण जदसे नेतृत्वाला असल्या कोणत्याही राजकीय
नैतिकतेची आणि सुचीतेची काळजी करायचे कारण नव्हते कारण कोपलेली “मुख्यमंत्र्याची
खुर्ची” अलगत त्यांच्या हातात आली होती.
हा प्रकार भा.ज.प.
नेतृत्वाच्या मानसिकतेला धक्का देणाराच होता कारण या परिस्थितीची कल्पनाच त्यांनी
केली नव्हती. तरी भा.ज.प. नेतृत्वाची दुसरी मदार होती ती कॉंग्रेस मधील “लिंगायत”
आमदारांवर. कर्नाटक निवडणुकीच्या आधीपासून आणि निवडणुकीमध्ये पण कॉंग्रेसने
“लिंगायत” समाजाचे मत मिळवण्यासाठी जे “राजकारण” केले ते भा.ज.प.च्या पारड्यात मत
टाकून “लिंगायत”समाजाने ते पूर्णपणे झिडकारले असे समजायला हरकत नाही आणि याच
दबावातून जिंकलेले “लिंगायत” आमदार कॉंग्रेस विरोधात बंड करतील आणि आपल्या सोबत
येतील हा विश्वास पण भा.ज.प. ला होता. पण अगोदर गोवा, मिझोरम सारख्या राज्यात बहुमत
मिळवून पण तोंडावर पडलेले कॉंग्रेस नेतृत्व या वेळेस अधिक सजग राहिले. त्या मुळे
सगळ्यात आधी त्यांनी आपल्या आमदारांना एका ठिकाणी जमवून आपले “संख्याबळ” कमी होणार
नाही याची पुरती काळजी तर घेतलीच पण त्याच सोबत आपल्या “नवीन मित्राला” पण घ्यायला
लावली.
या सगळ्या कसरती
करतांना राज्यपालांनी बहुमत सिद्ध करायला भा.ज.प.ला दिलेले १५ दिवसाचा निर्णय हा कॉंग्रस-जद्से
युतीच्या नवनेतृत्वाची डोकेदुखी वाढवणारा आणि हाता-तोंडाशी आलेला “घास” पळवून लावणारा
असा होता. म्हणूनच कॉंग्रेस ने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जात हा निर्णय
फिरवला आणि अजून १५ दिवसांनी द्यावा लागणारा राजीनामा येदीयुरप्पा यांना अडीच
दिवसातच द्यावा लागला.
आता पुढे काय ?? हाच
खरे तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याला कारण कन्नड राजकारणाचा गत इतिहास आणि
त्यातील पात्र. कारण हा राजकारणाचा “कन्नड” इतिहास जरी नव्याने लिहायला घेण्याचा
प्रयत्न सुरु झाला असला तरी त्यातील “पात्र” तीच जुनी आहेत त्या मुळे त्यांच्या इच्छा,
आकांक्षा आणि महत्वाकांक्षा त्यांना जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा करायला
लावतात का हे बघणे मनोरंजक ठरेल.
या कोणी काय कमावले
आणि काय गमावले ??
यात भा.ज.प.ने “पार्टी
विथ डिफरन्स” हि आपली छवी काही प्रमाणात गमावली, काही प्रमाणात का? याचे उत्तर
खाली येईलच. पण एक सगळ्यात मोठी गोष्ट शिकला असेल तर ,”जो दुसर्या वरी विसंबला,
त्याचा कार्यभार संपला” हे, कारण नको तेव्हडा त्यांनी विश्वास जदसे नेतृत्वावर
ठेवला. दुसरे म्हणजे गुजरात निवडणुकांच्या निकालानंतर लिहलेल्या लेखात लिहल्या प्रमाणे
भा.ज.प. ला “सबका साथ, सबका विकास” मधील विकास “सर्वलक्षी प्रभावी” करावा लागेल जो अजून असला
तरी तसा दिसत नाहीये, तसेच कॉंग्रेसने दूर नेलेले दलित भा.ज.प.ला पुन्हा खेचून आणावे लागेल. दुसरे म्हणजे मोदी-शहा या जोडी विरुद्ध पक्षा बाहेरील आणि
स्व पक्षातील देखील विरोधक एकत्र येतील ज्या मुळे भा.ज.प. च्या समस्येत उत्तोरत्तर
वाढ होईल. या वर उपाय शोधायला हवा. अर्थात नागरिकांना “विकास” आणि त्यांचा “फायदा”
व्यवस्थित दिसला तरी अजूनही मोदींना दुसरा पर्याय भारतीय राजकारणात सध्या तरी
नाही.
कॉंग्रसला आपण ७०
वर्षात राज्यकर्ते असतांना केलेली पाप आणि संविधानाची मोडतोड फक्त ४ दिवसात
मोदी-शहा या जोडीने भूता सारखे समोर आणून उभे केली आणि तसेच आपण सत्ता राबवत असतांना वागत होतो तसे आपल्या सोबत दुसरे वागले
तर आपली अवस्था काय होते ते दाखविले. कॉंग्रेसने यातून फक्त सत्ता कमावली आणि भा.ज.प.ला
शह द्यायचे मानसिक समाधान. मात्र कुमारस्वामी सारखी सोबत घेऊन आपली डोकेदुखी
वाढविली. “राहुल गांधी का मास्टर स्ट्रोक” सारखी वाक्ये समाज माध्यमातून लिहणाऱ्यानी
लक्षात घ्यावे कि कॉंग्रेस राष्ट्रीय पातळीवर सरकार विरोधात प्रचार करतांना ज्या
दोन मुद्यांना कॉंग्रेस नेतृत्व जोमाने पुढे आणत होते ते मुद्देच हातातून सटकले १)
EVM हाकिंग होते म्हणून भा.ज.प. जिंकतो हा मुद्दा आता हातातून गेला कारण तुमचे
सरकार बनते तेव्हा तेच EVM तुम्हाला चालतात. पंजाब च्या वेळेस पण हाच अनुभव होता
आता कर्नाटक त्यातच पण जमा झाला आणि २) सगळ्यात महत्वाचे म्हणजे “सुप्रीम कोर्ट”
केंद्र सरकारच्या इशार्यावर काम करते हा आरोप करून देशाच्या संवैधानिक संस्थांबद्दल आणि मोदी याच्या बद्दला जे संशयाचे वातावरण तयार
केले जात राजकारण खेळले जात होते त्याला स्वत:च्या हातून चाप बसवून घेतला. ज्या
मुख्य न्यायमूर्तींच्या विरोधात अभियोग प्रस्ताव आणणार होते, त्याच मुख्य न्यायमूर्तींकडे
रात्री २ वाजता “आम्हाला न्याय द्या” म्हणून जावे लागले आणि “न्याय मिळला” म्हणून
नाचावेही लागले. म्हणजेच भारतीय न्यायव्यवस्था अजूनही निष्कलंक आहे हे अप्रत्यक्ष
पणे मान्यच केले. आता या नंतर कोणते निकाल कॉंग्रस पक्षाच्या विरोधात गेले तर नक्की
खापर कोणावर फोडणार??
यातून सामान्य
मतदाराने बोध इतकाच घ्यायचा कि येणाऱ्या काळात अजून नैतिक राजकारण जास्त दिसणार नाही.
बहुमत नसतांना पण मुख्यमंत्री बसवणे हे भा.ज.प.चे वागणे जितके अनैतिक होते तितकेच
अनैतिक जनतेने झिडकारल्या नंतरही कॉंग्रसने बाजूला न होता आपल्या पेक्षा कमी जागा
असलेल्या पक्षाला “मुख्यमंत्री” पद देत सत्तेला चिटकून राहणे हि होय. म्हणून फक्त
भा.ज.प.लाच “सत्ता पिपासू” म्हणण्याला काही अर्थ राहत नाही कॉंग्रेस पण तीत्कीत “सत्ता
पिपासू” आहे यात किंचितही शंका कोणाच्या मनात राहू नये. त्यातल्या त्यात भा.ज.प.
सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आल्यावर त्याला “हातपाय” हलवणे आवश्यक होते. मात्र
भा.ज.प. कुमारस्वामींशी बोलला तर “घोडेबाजार” आणि कॉंग्रेस बोलला तर ते “राजकारण”
असा दुप्पटी व्यवहार भारतीय प्रचार माध्यमे जरी करत असली तरी भारतीय मतदार जनतेने
करू नये, हा “धडा” आपल्यासाठी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा