"असिफाला" न्याय मिळायलाच हवा........पण


कठुआ” हे गाव आणि “जम्मू” हे सध्या सगळ्या पुरोगाम्यांचे “तीर्थक्षेत्र” झालेय. का नाही होणार ?? गेले अनेक वर्ष हे “पुरोगामी” घसा कोरडा करून “हिंदू समाजा” विषयी सांगत होते त्याचे “पुरावेच” जणू या “कठुआ बलात्कार” प्रकरणाने त्यांना दिले.

“कठुआ बलात्कार” हा खरेच मानवतेवरील सर्वात मोठा “कलंक” आहे हे मान्य करायला नक्कीच लाज वाटायला नको. ज्यांनी कोणी हे कृत्य केले ते मग कोणत्याही जातीचे, धर्माचे, वर्णाचे असो त्यांना योग्य तो “संविधानिक शिक्षाच” नाही तर त्याहून जास्त “शिक्षा” मिळायलाच हवीच, माझ्या मते भारतात राहणाऱ्या कोणत्याही संवेदनाशील सामान्य जनतेचे हेच म्हणणे असेल.

पण.......खरे तर या “प्रकरणा” नंतर ज्या प्रमाणे “राजकारण” व्हायला लागले ते बघून खरोखर “शिसारी” येण म्हणजे काय?? त्याचाच प्रत्यय येत आहे. खरे तर ८ वर्षे वयाच्या एका पोरीवर “सामुहिक बलात्कार” झाला या शिवाय पण या घटनेला अनेक पैलू आहेत, यात त्या पोरीचा “धर्म” कोणता ?? त्या “बलात्कार” करणार्यांचा “धर्म” कोणता ?? इतकच काय पण ती घटना ज्या ठिकाणी झाली त्या जागेचा पण “निर्लज्ज” सबंध या प्रकरणात लावल्या गेला.


खरे तर “बलात्कार” सारखी घटना हि “विकृती” या प्रकारात मोडते. “बलात्कार” जिच्यावर होतो त्या व्यक्तीचे वय काय ?? धर्म कोणता ?? जात काय ?? हा प्रश्न खरे तर “वासनेने बरबटलेल्या” अतिशय विकृत अश्या मानसिकतेच्या “बलात्कार्याला” खर्च पडत असेल ?? पण घटना घडल्या नंतर आलेल्या “माध्यमांना” आणि इतरवेळी गपचूप बसलेल्या तथाकथित ”समाजसुधारकांना”  मात्र नक्कीच पडतो. त्यातही घटना “जम्मू आणि काश्मीर” सारख्या अगोदरच धार्मिक दृष्ट्या संवेदनशील भागात घडली असल्यामुळे आणि या घटनेत आरोपी “हिंदू” असल्यामुळे तर हि लोक इतकी वाहवत गेली कि या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मार्गदर्शक तत्वाला हरताळे फासत “बलात्कारित” मुलीचे छायाचित्र पण प्रदर्शित करायला यांना लाज वाटली नाही.


याच सोबत आता डाव्या लोकांच्या मांडीवर बसून “संविधान” आणि “न्याय” याच्या बाता मारणारे काही तर हि घटना “मंदिर” मध्ये घडली याचे भांडवल करत सरळ सरळ “हिंदू” धर्म सोबतच त्याच्या “श्रद्धा स्थानावर” समाज माध्यमामध्ये अर्वाच्य भाषेत टिपणी करत आहेत. पण त्यांना हे माहित आहे का ? “गर्व से कहो हम हिंदू है” च्या एवजी “गर्व से कहो हम रेपिस्ट है” सारखी वाक्ये का ? किंवा राम – सीता यांचे व्यंगचित्र काढून सीतेच्या तोंडी “बर झाले मला “रावणा” ने पळवले तुमच्या भक्तांनी पळवली असती तर काय झाले असते ?” सारखी वाक्ये लिहणे खरेच बरोबर आहे का?? 
https://m.facebook.com/groups/360912253932413?view=permalink&id=2766126466744301

खरे तर असली नृशंस घटना मंदिरात घडल्या बद्दल प्रत्येक हिंदुच्या मनात राग आहेच आणि आरोपीला योग्य शिक्षा व्हावी हि त्याची कामना पण आहे. मात्र या घटनेचे भांडवल करत संपूर्ण “हिंदू” समाजाला दोषी कसे ठरविले जात आहे ?? गंमत म्हणजे आता “हिंदू” समाजावर दोषारोपण करणारी मांडळी तीच आहे जी भारतात आणि जगात कुठेही झालेल्या कोणत्याही “इस्लामी  आतंकवादी” हल्ल्या नंतर मात्र “इस्लाम” हा “शांतता प्रिय धर्म” धर्म आहे असे सांगत असतात. सोबतच काही “माथेफिरू लोकांच्या” पापाचे खापर सामुर्ण मुस्लीम समाजावर फोडू नका असे बजावीत असतात. इतकेच नाही तर काश्मीर समस्येचे मुळ “धार्मिक” आहे हे पण हे लोक नाकारत असतात.      

 खरे तर हि घटना आहे जानेवारीत घडलेली, त्याचा तपास जम्मू काश्मीर पोलीसांच्या “क्राईम ब्रांच” कडे आल्यावर त्यांच्या म्हणण्या नुसार त्याची उकल झाली. एप्रिल मध्ये या घटनेला देशातील “मिडिया” ने उचलून धरले. पण यात खरा समाजाचा भेसूर चेहरा समोर आला जेव्हा “आरोपींच्या” बाजूने काही संघटना आणि भा.ज.प. चे तेथील दोन आमदार समोर आले तेव्हा. सध्या तरी आरोप आणि प्रत्यारोपाच्या गदारोळात नक्की “सत्य” काय ? हे कळणे जरी मुश्कील असले तरी या लोकांना जम्मू काश्मीर पोलिसांच्या तपासावर विश्वास नसून हि केस CBI कडे हस्तांतरित करावी अशी मागणी करण्यासाठी “शक्तीप्रदर्शन” केले असे सांगण्यात येत आहे. हीच CBI कडे तपास सोपवायची मागणी जम्मू काश्मीर मधील “कॉंग्रेस” ने पण केली होती, हे सत्य पण लक्षात घ्यावे. 

या प्रकरणाला अनेक राजकीय आणि सामाजिक “कोन” दिसायला लागत आहे.  काहींच्या मते यात बकरवाल-गुज्जर मुस्लीम आणि हिंदू पंडित याच्यात तेढ टाकायचा मुद्दा दिसत आहे. पण एक मात्र खरे कि काश्मिरी पंडित यांना जे भोगावे लागले आहे त्याचे पडसाद या घटनेत दिसत आहेत. 
यात नेहमीप्रमाणे भारतीय "मिडिया" ची बाजू पण संशयास्पद आहे. "मिडिया" एकजात एका मंदिरात हा प्रकार घडल्याचे सांगते आहे आणि त्या वरून विरोधक गदारोळ करत आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी कि "सबसे तेज" आणि "सबसे पहिले" दाखवणारी भारतीय मिडिया, आतंकवादी हल्ला सुरु असतांना सैन्य कोणत्या बाजूंनी अतिरेक्यावर हल्ला करायची तयारी करते आहे हे "LIVE" दाखवणारी भारतीय मिडिया, इतकेच काय पण दुबईत "श्रीदेवी" चे निधन झाल्यावर तिथे पोहचून, हॉटेल च्या त्या खोली पर्यंत पोहचलेली, बाथटब दाखवणारी भारतीय मिडिया अजून पर्यंत त्या मंदिराचे फोटो आणि परिसर मात्र दाखवू शकली नाही हे थोडे संशयास्पद नाही काय?? 
    
पण ज्या “हिंदुना” या घटने मुळे “हिंदू” असल्याची “लाज” आज वाटत आहे त्यांनी जरा १९९० च्या काश्मीर मध्ये डोकाऊन बघायला हरकत नाही, कारण “हिंदू” असल्याची आणि “भारतात” सरकार आणि संविधान आहे कि नाही अशी शंका येईल अशी परिस्थिती काश्मीर मध्ये “हिंदू पंडितांसाठी” तयार झाली होती. ती कशी होती ते या लिंक मधील कविता वाचून लक्षात येईल. “हिंदू” स्त्रियांवर फक्त “बलात्कार” करून यांचा आत्मा शांत झाला नव्हता तर त्या स्रियांना “आरा मशीन” मध्ये टाकून मधोमध चिरून फेकून दिले होते.


तरी “हिंदू” समाजाने  इतक्या “क्रूर घटनेची” तरफदारी न करता “योग्य आरोपीला योग्य शासन” व्हावे या करता जागरूक राहणे गरजेचे आहे. नाही तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार ??     

टिप्पण्या