त्रिपुरा
राज्यात शंतनू भौमिक या पत्रकाराची निर्घृण हत्या झाली. तरी पण भारतातील
“बुद्धिप्रामाण्यवादी” “लोकशाहीवादी” “अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी” असलेले
डावे आणि मध्यम मार्गी पत्रकार एकदम शांत आहेत. गेल्या आठवड्यात बंगलोर
येथे संपादक-पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्या बरोबर फक्त एक ते दीड
तासात ज्यांनी बॅनर, झेंडे नाचवले होते, दुसऱ्या दिवशी लगेच दिल्ली येथील
प्रेस क्लब वर जोरदार भाषण केली होती, दूरचित्रवाहिनी वर शिरा ताणून ताणून
पत्रकारांच्या हत्येची काळजी व्यक्त करत “अभिव्यक्ति स्वातंत्र्य” चा जयघोष
करत भारतातील एका विचारधारे विरुद्ध प्रचार सुरू केला ते सगळे या पत्रकार
शंतनू भौमिक याच्या हत्येवर कसे शांत राहिले याचे मोठे आश्चर्य वाटत होते.
अशा बुद्धिवाद्यांच्या हत्या झाल्या तेथे स्थानिक सरकार कुणाचे आहे याचे
काही देणेघेणे या बुद्धिवाद्यांना नसते कारण त्याच्या समोर त्याचा शत्रू
नेहमीच तयार असतो, तरी पण कम्युनिस्ट सरकार असलेल्या त्रिपुरा येथे अशी
हत्या झाल्या नंतर पण ही लोक गप्प कशी राहिली ?
याच कारण ज्यांनी
हत्या केली त्यात दडलं आहे. इकडे आपल्याला सांगितल्या गेलं की इंडिजन्स
पीपल फ्रंट ऑफ त्रिपुरा (IPFT) आणि त्रिपुरा राजेर उपजाती गणमुक्ती परिषद
(TRUGP) या दोन संघटनांच्या राजनैतिक संघर्षाचे वृत्ताकन करण्यासाठी
गेलेल्या स्थानिक दुरचित्रवाहिनी “दिन-रात” चा स्व. शंतनू भौमिक पत्रकार
होता.
पण खरी गंभीर घटना ही आहे की शंतनू याला घेरून पळवण्यात आलं
आणि त्याला लाथा बुक्क्या मारत अतिशय निर्घृण पणे मारण्यात आले. हे सगळे
होत असताना पोलीस समोर होते, पण पोलिसांना पण शंतनू याचे शव ताब्यात
घ्यायला दोन तास लागले.
या वरून लक्षात येईल की पोलिसांनी पण या घटनेमध्ये फक्त बघ्याची भूमिका घेतली. आता पोलिसांची ही भूमिका कोणत्या कारणांनी होती. तर त्याच खर कारण या संघटनांच्या मागे असलेल्या पक्षांच्या नावात दडल आहे.
IPFT ही संघटना अनुसूचित जाती जमातीच्या भल्या साठी डाव्या विचारावर मोठी
झालेली आणि त्रिपुरा मध्ये दंगे, दहशदवाद, अपहरण करून मोठी झालेली “नॅशनल
लिब्रेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा” या दहशतवादी संघटने सोबत आहे, पण सध्या
तथाकथित पद्धतीने सध्या तेथे सत्तारूढ असलेल्या मा क प दविरुद्ध आहे. गंमत
म्हणजे 2000 साली तेथील स्थानीय निवडणूका ज्याला The Tripura Tribal Areas
Autonomous District Council (TTAADC) असे म्हणतात त्या निवडणुकीत या
दहशतवादी संघटनेने ज्या दोन बाजूंना निवडणुकीत आपला पाठिंबा दिला होता
त्यात ही IPFT होती आणि दुसरे होते “लेफ्ट विंग”
TRUGP ही दुसरी संघटना पण डाव्या विचारसरणीचा पक्ष CPM याची अनुसूचित जाती जमाती याच्या साठी तयार केलेली विंग आहे.
आता सांगा काल पर्यंत “अभिव्यक्ती स्वातंत्र्य” आणि “पत्रकारांची सुरक्षा”
आणि “लोकशाही” या करता गळे काढणारे आपले “बुद्धिप्रामाण्यवादी” पत्रकार
गप्प बसणार नाही का? ते त्याच्याच लोकांची “निंदा” करून स्वतःचा पुन्हा
“शंतनू भौमिक” करून घेणार आहे का??
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा