आता काही वर्षा पूर्वी राजधानी दिल्ली मध्ये "अण्णा हजारे" नावाच्या माणसाने भ्रष्टाचाराच्या विरोधात एक आंदोलन उभे केले. या आंदोलनाला "अभूतपूर्व" प्रतिसाद लाभला, जितके जाणते - अजाणते नेते या आंदोलनाला भेटले तितकेच या आंदोलनांनी दिले. विशेष म्हणजे या आंदोलनातून एका राजकीय पक्षाचा उदयच झाला नाही तर एका राज्यात जुन्या जाणत्या मोठ्या पक्ष्यालाया धूळ चारून सत्तेत पण आला.
आठवत का हो तुम्हाला? त्या वेळेची परिस्थिती, त्या वेळेसचे "भरावलेपण", अण्णा हजारे हे जेल मधून बाहेर आले तेव्हा निघालेली विशाल रॅली, त्याचे पूर्ण भारतात वृत्तवाहिन्यांनी केलेले प्रसारण, या अण्णा हजारेंना "प्रति महात्मा गांधी" बनवून टाकले होते. पण मग आज काय झाले?? ते जनतेचे "भरावलेपण" कुठे गेले? या आंदोलनातून भारताच्या आजूबाजूच्या देशांना "प्रेरणा" मिळाली होती, जगभरातून या आंदोलनाला प्रतिसाद मिळत होता, पण या आंदोलनातून मिळालेला पक्ष "आम आदमी पार्टी" आणि नेते "अरविंद केजरीवाल" यांच्या विषयी नक्की काय भावना भारतीय जनतेच्या मनात आहेत?? एक वेळ होती की "केजरीवाल" भारताचा "पंतप्रधान" पण बनू शकतील असे वाटणारे आज या माणसा विषयी नक्की काय म्हणतात??
खर तर इतकं सगळं "रामायण" लिहायचे कारण वेगळे आहे. कारण आहे "लेनिन". "त्रिपुरा" राज्यात कॉम्रेड लेनिन यांचा पुतळा पाडल्या गेला आणि "भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील" लेनिन यांचे किती योगदान आहे, आणि लेनिन हे कसे भारतातील काही फासावर गेलेल्या "क्रांतिकारकांचे" गुरू आहेत त्या मुळे हा पुतळा पाडणे किती वाईट आहे याचा मारा सुरू झाला. भारताच्या वेगवेगळ्या "इतिहासाच्या आकलना" तील एक "वामपंथी इतिहास आकलन" नव्या जोमाने पुढे आले. पण व्यवहारिक दृष्ट्या यात तथ्य किती आहे ते आपण बघू.
पहिले तर असा दावा केल्या गेला की रशियाचा "सोवियत रशिया" करून सत्तेत आलेल्या अध्यक्ष कॉम्रेड लेनिन यांनी भारताच्या स्वातंत्र लढ्याला पूर्ण "पाठिंबा" दिला आणि इथल्या "क्रांतिकारक" संघटनांना शस्त्रे पुरविली.
प्रथम तर एक गोष्ट मान्य नक्कीच केली पाहिजे की जग बदलण्याऱ्या ज्या घटना झाल्या त्या घटनांमध्ये "रशियन क्रांती" ही महत्वाची घटना आहे. खरे तर 1789 मध्ये "फ्रान्सची राज्यक्रांती" ही खरे तर अनेक देशातील नेत्याचे प्रेरणास्थान झाली होती. आज आपण सतत ऐकतो ती "स्वातंत्र्य-समता-बंधुत्व" ही तत्वे जगाला या "फ्रेंच राज्यक्रांतीने"च दिली. पण त्या वेळेस भारतातील परिस्थिती आणि जनसमपर्काच्या सोइ नसल्यामुळे त्या घटनेचा भारतावर जास्त प्रभाव तेव्हा लगेच पडला नाही. इतकेच काय तर त्या नंतर झालेल्या "नेपोनियन" याचा पण काही प्रभाव भारताच्या इतिहासात दिसत नाही.
भारताच्या स्वतंत्र लढ्याचा इतिहास बघितला तर इंग्रजांविरुद्ध पहिला मोठा लढा उभारला तो 1857 साली म्हणजे लेनिन ची क्रांती व्हायच्या 60 वर्षे अगोदर, त्या नंतरही भारतीय सतत इंग्रज सत्तेशी दोन हात करत आले. वासुदेव बळवंत फडके, खुदिराम बोस, मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे या सारखे "क्रांतिकारक" लेनिनच्या क्रांती अगोदरच "बॉम्ब" आणि "इतर शस्त्र" मिळवायची व्यवस्था भारतीयांनी केली होती. 1920 साली काँग्रेसचे जहाल वादी नेते लोकमान्य टिळक यांच्या मृत्यू झाला त्याच्या 5 वर्षे अगोदर 1915 साली महात्मा गांधी आफ्रिकेतून त्यांचे "सत्य आणि अहिंसा" हे तत्व घेऊन भारतात आले आणि "भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या राजकारणावर"गारुड केले. त्याच बरोबर भारतात शस्त्र क्रांतीची लाट कमी झाली होती.
भारताच्या स्वतंत्र लढ्याचा इतिहास बघितला तर इंग्रजांविरुद्ध पहिला मोठा लढा उभारला तो 1857 साली म्हणजे लेनिन ची क्रांती व्हायच्या 60 वर्षे अगोदर, त्या नंतरही भारतीय सतत इंग्रज सत्तेशी दोन हात करत आले. वासुदेव बळवंत फडके, खुदिराम बोस, मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे या सारखे "क्रांतिकारक" लेनिनच्या क्रांती अगोदरच "बॉम्ब" आणि "इतर शस्त्र" मिळवायची व्यवस्था भारतीयांनी केली होती. 1920 साली काँग्रेसचे जहाल वादी नेते लोकमान्य टिळक यांच्या मृत्यू झाला त्याच्या 5 वर्षे अगोदर 1915 साली महात्मा गांधी आफ्रिकेतून त्यांचे "सत्य आणि अहिंसा" हे तत्व घेऊन भारतात आले आणि "भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या राजकारणावर"गारुड केले. त्याच बरोबर भारतात शस्त्र क्रांतीची लाट कमी झाली होती.
तरी काही "क्रांतिकारी" संघटना भारतात तयार होतच होत्या आणि कारवाया पण करतच होत्या. महाराष्ट्राला परिचित "अभिनव भारत" पण त्यातील एक. मग या सगळ्यात "लेनिन" कुठे बसला??
ही गोष्ट नाकारण्यात अर्थ नाही की 1917 साली झालेली "रशियन राज्यक्रांती" जगा करता एक आश्चर्य होती. रशिया सारखा एक अजस्त्र देश, एक बळकट साम्राज्य, तेथील राजाला हटवून आपल्या ताब्यात घेतलं. "फ्रांस राज्यक्रांती" नंतर आणि "अमेरिकन स्वातंत्र्यलढ्या" नंतर जगावर भावनिक आणि राजकीय प्रभाव टाकणारी खूप मोठी ही घटना होती. त्या मुळे भारतातील "सामाजिक आणि राजकीय" परिस्थितीत ही घटना अनेकांना आकर्षक वाटलीच असेल. त्या मुळे अनेक लोकांनी त्या घटनेच्या अंगाने लेनिन-मार्क्स आणि साम्यवाद याचा अभ्यास पण सुरू केला असेल.
अनेकांना अशीच "क्रांती" भारतात करण्याचे "भारावलेले स्वप्न" पण पडले असेल. पण त्या मुळे असे अजिबात नाही की लेनिनला भारतातील क्रांतिकारी "गुरू" मानत होते आणि त्या मुळे लेनिन भारतीय लोकांचे "नेते" झाले. हे शुद्ध फोल "भारतीय इतिहासाचे" साम्यवादी "आकलन झाले.
हे खरे असेल की लेनिन ने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला समर्थन दिले पण "सोवियत रशियाचे" तेव्हाचे आणि त्या नंतरचे जागतिक राजकारण बघता त्यात भारत स्वतंत्र करण्याची इच्छा किती आणि साम्यवादी राजवटी खाली आणून "सोवियत रशिया" ला "हिंद महासागराशी" जोडण्याची इच्छा किती हा "अभ्यासाचा प्रश्न" नाही का?
असे नाही की भारतात "डाव्या" विचाराने भारावलेले आणि भारतावर निस्सीम प्रेम करणारे नेते सोवियत रशिया कडे मदत मागायला गेले नव्हते. पण त्याच्या हातात या "डाव्या" लोकांनी देशात आणि परदेशात काय दिले? याचे मोठे उदाहरण म्हणजे "सुभाष चंद्र बोस"
दुसऱ्या महायुद्धात इंग्लड गुंतलेला आहे आणि आताच त्याच्या इथल्या साम्राज्यावर घाव घातला तर आपण लवकर स्वातंत्र होऊ या विचाराने प्रेरित होऊन सुभाष बाबू "क्रांती" ला मदत करतील या अपेक्षेने भारतातून पलायन करून प्रथम "सोवियत रशिया" कडेच गेले. पण "सोवियत रशिया" तेव्हा स्वतः "इंग्लंड" च्या सोबत असल्याने त्यांना तेथे निराशाच हातात आली आणि शेवटी व्यवहारिक भूमिका घेत त्यांना "फॅसिस्ट" हिटलर ची मदत मागावी लागली, आणि हिटलरच्या सोबत असलेल्या "जपान" बरोबर जाऊन आपली "आझाद हिंद सेना" उभारावी लागली. त्या वेळेस "भारतातील साम्यवादी" नेत्यांनीही तत्कालीन "सोवियत रशियाच्या" नेतृत्वावर "भारताच्या स्वातंत्र्या" करता सुभाषबाबूना मदत करायला "शब्द" तर टाकला नाहीच, पण "हिटलर" आणि "जपान" या "सोवियत रशिया" विरोधी लोकांची मदत घेतली म्हणून इथे भारतात आपल्या "मुखपत्रा" मधून सुभाषबाबूंची येथेच्छ "बदनामी" जरूर केली.
भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यावर पण भारताला "आर्थिक दृष्ट्या" उभे राहण्यास आणि मोठे कारखाने उभारण्यात भारताला "सोवियत रशियाने" मदत केली. पण त्या करता त्या वेळेच्या "जागतिक राजकारण" आणि भारतीय राज्यकर्त्यांचे मानसिक "भारावलेपण"त्यास जास्त कारणीभूत होते.
राहिला प्रश्न भारताच्या "सामाजिक परिस्थितीत" बदल करण्याचा "साम्यवादी" प्रयत्नांचा. तर भारतात सामाजिक आणि धार्मिक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न हा भारतात "साम्यवादी" विचार येण्या आधी पासूनच आहे आणि त्याचे आदर्श मार्क्स - लेनिन नसून, युरोपिअन समाज, फ़्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन स्वातंत्र्य लढा अधिक आहे. राजा राममोहन राय, परमहंस सभा, प्रार्थना सभा, न्या. रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर, ब्रम्हो समाज या संस्था आणि व्यक्ती अगोदर पासूनच भारतातील चुकीच्या धार्मिक आणि सामाजिक रूढी परंपरा याच्या विरोधात लढा देत होत्या आणि यशस्वी पण होत होत्या या काही "साम्यवाद विचार" वाचल्यावर किंवा "लेनिन" याच्या कार्यामुळे नाही.
"साम्यवाद आणि लेनिन" यांच्या कार्याला विचारला एका सीमेपर्यंत नक्कीच आपण आदर देऊ. पण सध्या देशातील "लाल माकड" ज्या प्रमाणे "लेनिन" याला भारताचा "तारणहार" म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे तो प्रकार लांच्छणास्पद आहे आणि या विरोधात आपण उभे राहायलाच हवे.
निखिल वागळे आणि प्रकाश बाळ सारख्या पत्रकारांचे "भारताच्या इतिहासासंदर्भात" असलेले "साम्यवादी आकलन" खोडुन काढायलाच हवे. भारतात आणि जगात याच "साम्यवादी आकलना" मुळे किती जनतेचा "अकाली मृत्यू" झाला याचा पण हिशोब झालाच पाहिजे. विशेषतः याच "भारतीय साम्यवादी" लोकांनी भारताच्या कठीण प्रसंगी "स्वतःच्या विचारधारेच्या" फायद्यासाठी कश्या "भारतविरोधी" भूमिका घेतल्या याचा एक मोठा इतिहास आहे तो पण आपण नंतर बघूच.
कोणाचाही "पुतळा" तोडणे हे "निषेधार्थ"च आहे. पण म्हणून "इतिहासाचे आकलन" स्वतःच्या फायद्यासाठी करून समाजात फूट पाडणे योग्य नाहीच आणि "साम्यवादी" नेमके तेच करत भारतातील सामाजिक स्वास्थ स्वतःच्या फायद्यासाठी धोक्यात आणत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा