"झुंडशाही" आणि "इतिहासाचे आकलन"


                  लेलीनचा पुतळा "त्रिपुरा" या राज्यात पडला गेला आणि आगडोंब उसळला. त्रिपुरा राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गेले 25 वर्षे "डाव्यांच्या" हातात असलेले राज्य अलगत पूर्ण विरोधी विचारांच्या म्हणजेच "उजव्या" विचारांच्या भा.ज.प. च्या हातात गेल्यावर लगेच पहिली घटना म्हणजे "लेलीनचा पुतळा" पाडण ही झाल्या मुळे या घटनेचे "राजकीय मूल्य" खूप जास्त झाले.


                    त्या मुळेच लगेच ही घटना वृत्त वाहिन्या आणि सोशल मीडिया वर भाव खायला लागल्या. या मुळे पुन्हा "उजव्या" किंवा "हिंदुत्ववादी" पक्षांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्याया "झुंडशाही" आणि तथाकथित "ब्राम्हणवाद" विरोधात "डावे" आणि "पुरोगामी" पक्षांच्या लोकांनी वातावरण तापवायला सुरवात केली. वरून इतिहासाचे दाखले देतांना "नथ्थुराम गोडसे" चा पुतळा का फोडावसा वाटला नाही? हा पण प्रश्न विचारला गेला. अर्थात कोणताही "पुतळा फोडणे" म्हणजे "झुंडशाहीच" असते हे काही या "बुद्धिवंताच्या" लक्षात आले नाही की घेतल्या गेले नाही ही गोष्ट तेच जाणो. तरी या "झुंडशाही" बद्दल काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील.



                   "झुंडशाहीवादी" अथवा  "ब्राम्हणवादी" म्हणजे नक्की कोण ? हे मला तरी न उमजलेलं कोड आहे. दुसऱ्यावर राजकीय , वैचारिक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करणारे "ब्राम्हणवादी" असतील तर त्यात सगळेच येतात की, फक्त त्याचे दैवत बदलतात काहींचे "गांधी" काहींचे "आंबेडकर" तर काहींचे "शाहू" तर काहींचे "मार्क्स किंवा लेलीन" असतात विचारधारा बदलली तरी स्वप्न तीच असतात आणि "क्रांती" झाली की उत्तर पण तीच असतात म्हणून तर "स्टालिन" काही लाख लोकांना "सोवियतचे शत्रू" म्हणून मारू शकतो तर "माओ" सांस्कृतिक क्रांती" च्या नावाखाली लाखो लोकांचे जीवन संपवतो. तसेच पुतळा "दादोजी कोंडदेव" किंवा "राम गणेश गडकरी" यांचा असेल तर ती "क्रांती" असते आणि "लेलीन" चा असेल तर "झुंडशाही"



                खरे तर आताच्या या राजकारणात "शोषित आणि शोषणकर्ता" या सगळ्या "अंधश्रद्धा" वाटायला लागल्या आहे. खरे हे आहे की, शोषित तोच पर्यंत शोषित असतो जो पर्यंत त्याच्या हातात "काठी" येत नाही, ती कधी "सामाजिक संघटनेच्या" रूपाने, तर कधी "कामगार संघटनेच्या" रूपात असते मग हत्यार म्हणून त्याला जे मिळेल म्हणजे ते "संविधान" असो की "AK 47" तो जो पर्यंत "शोषणकर्ता" होत नही तो पर्यंत चालवतो आणि स्वतःच "शोषित" असल्याचा आव आणतो.


               एक लेनिन ची मूर्ती हलली तर "डावे" बिथरले. पण या डाव्यांच्या राज्यात किती तरुण-आदिवासी फक्त विचारधारा मानत नाही म्हणून मारल्या जातात त्याचे दुःख अजिबात होत नाही तर ती "क्रांती" म्हणून त्याचे "ग्लोरिफिकेशन" केले जाते. याच त्रिपुरामध्ये पहिल्यादा सत्तेत आल्यावर "डाव्यांनी" राजीव गांधी यांचा पुतळा फोडला, याच काँग्रेसच्या नेत्याने सत्तेत आल्यावर "अंदमान" मधील स्वातंत्र्यवीर सावरकर याच्या कवितेच्या ओळी आणि त्याचे नाव पण पुसायचा प्रयत्न केला.


                  त्रिपुरा -केरळ-बंगाल येथिल राजकारण "बिहार" पेक्षाही "रक्तरंजित" नक्की कोणामुळे झाले याचा विचार करणे पण आवश्यक नाही का?? जे लोक कर्नाटकच्या पत्रकार "गौरी लंकेश" याच्या खुना विरुद्ध "छाती पिटत" होते तेच लोक मात्र त्रिपुरामध्ये खून झालेल्या पत्रकार "शंतनू भौमिक" या प्रकरणावर चिडीचूप होते हे याचेच लक्षण आहे. बर याना "कविता कलोइ" तरी आठवते का??? फक्त भाजपला मत दिले म्हणून मारले ही तर आताच्या निवडणुकीचेच प्रकरण आहे तेव्हा सगळे थोर पत्रकार कुठे होते??? 



                    प्रकाश बाळ सारखे थोर पत्रकार समजा "लेलीन-स्टालिन-माओ" यांनी केलेल्या हत्या या हत्या नसून इतरांचे "इतिहासाचे आकलन" कमी पडतंय असे वाटत असेल तर मग "गोडसे" ने केलेल्या हत्येत पण हेच "इतिहासाचे आकलन" कमी नाही पडत का??? याचा विचार करणे पण आवश्यक आहे. 



             कदाचित याच "इतिहासाच्या आकलनातून" महाराष्ट्रात झालेल्या "भांडारकर इस्टिट्यूट तोडफोड" "दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरण" "राम गणेश गडकरी पुतळा प्रकरात" प्रकाश बाळ सारखे पत्रकार म्हणवून घेणारे पत्रकार मूग गिळून बसले होते. या गोष्टींना "झुंडशाही" म्हणण्याचे बळ पण यांच्यात नव्हते.



                एकूणच "झुंडशाही" किंवा तथाकथित " वर्चस्ववादी ब्राम्हणवाद" कुणाला नको आहे असे नाही तर "तो आम्ही करू तर योग्य" हा त्या मागचा खरा विचार आहे.


टिप्पण्या