भारताच्या राजकीय पटलावर अधिक प्रबळपणे जेव्हा पासून
“हिंदुत्ववादी” विचारधारेच्या पक्षाचे राज्य आले आहे तेव्हा पासून उगाच “साप”
म्हणून “भुई” धोपटणाऱ्या लोकना “अराजकीय चांगले दिवस” आले आहेत. पहिले
“असहिष्णुतेच्या” नावाखाली रडगाणे, त्या करता “पुरस्कार वापसी” चा खेळ केल्या
गेला. सोबतच JNU च्या निमित्याने “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पण हातात जास्त
काही पडले नाही. म्हणून “हिंदू” समाजातील सगळ्यात जटील प्रश्न “जातीयाता” वर भर
देत त्या वरील वेगवेगळे प्रश्न प्रायोगित तत्वा वर समोर आणले गेले. त्यात सगळ्यात
पहिले आणल्या गेला तो “हैद्राबाद विद्यापीठातील” “वेमुला आत्महत्या” प्रकरणाचा
खेळ. पण मुळातच “लाल लांडग्या” च्या सोबतीने खेळल्या गेलेल्या या प्रयोगाला भारतीय
जनतेने जास्त प्रतिसाद दिला नाही.
आधीच्या लेख ““प्रयोगशाळा” नक्की कोणाची??” (http://maheshvaidya.blogspot.in/2017/12/blog-post.html) या लेखात लिहण्याप्रमाणे भारतात तथाकथित “पुरोगामी” राजनेत्यांनी सत्ता
मिळवण्या साठी आणि टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने “प्रयोगशाळा” बनवलेच
होते. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात तर या “पुरोगामी प्रयोग” करणाऱ्या
“शास्त्रज्ञ” लोकांचा सुळसुळाट झाला आहे. त्याचीच फळ आज “भीमा –कोरेगाव” च्या
निमित्याने महाराष्ट्रात आज बघायला मिळत आहे.
“भीमा – कोरेगाव” येथे झालेल्या १ जानेवारी १८१८ झालेल्या
“पेशवे विरुद्ध इंग्रज” युद्धाट मिळालेल्या तथाकथित विजयाचे श्रेय म्हणून
“इंग्रजांनी” बांधलेल्या विजय स्तंभा” ला १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी पहिल्यांदा भेट देऊन या लढाईत इग्रजांच्या बाजूंनी लढत “मर्दुमकी
गाजवत” धारातीर्थी पडलेल्या ५०० “दलित सैनिकांना” मानवंदना दिली. त्या नंतर काही
वर्षांनी तेथे काही स्वयंसेवक नियमित जाऊ लागले. पण गेल्या काही वर्षात ते ठिकाण
जवळ जवळ “तीर्थ क्षेत्रच” झाले. इथ पर्यंत ठीक पण त्या जमणार्या “आंबेडकरी चळवळी”
च्या कार्यकर्त्यांच्या गर्दीचा फायदा घेणाऱ्या तथाकथित पुरोगामी नेते मंडळी
त्याला वेगळे वळण द्यायला लागले.
भारतात आणि महाराष्ट्रात सध्या “आरक्षणा” वरून वेगवेगळ्या
जातीत आलेल्या “तणावाच्या” पार्श्वभूमी वर तथाकथित “राजकीय इतिहासतज्ञ” “खरा-खोटा
इतिहास” च्या नावाखाली वातावरण अजूनच दुषित झाले किवा जाणून बुजून केल्या गेले.
विशेषत: “डाव्या चळवळीच्या” प्रभावाखाली गेलेल्या या “आंबेडकरी चळवळीच्या” काही
लोकांनी “हिंदू धर्माच्या” कालबाह्य आणि आधुनिक विचाराशी असंगत “रूढी-परंपरा” वर
“वैचारिक” घाव घालायच्या एवजी सरळ सरळ “हिंदू” धर्माची निंदा सुरु केली आणि
वातावरण अजून वाईट होत गेले.
या वर्षी “भीमा-कोरेगाव” च्या २०० व्या वर्धापन दिना
निमित्य “आंबेडकरी विचारधारे” सोबत “डाव्या चळवळीच्या” विचारधारे सोबत जी जवळीक
साधली ती डोळ्यात भरणारी आणि “अघटीत” घटना घडण्याला कारक परिस्थिती निर्माण झाली.
गेल्या काही वर्षात काही आंबेडकरी विचारधारेच्या लोकांची “डाव्या” विशेषत:
“माओवादी” विचारच्या लोकांशी चाललेली “चुम्बाचुम्बी” कोणच्याहि डोळ्यात येईल इतकी
वाढली आहे. “खैरलांजी” प्रकरणाच्या विरोधात महाराष्ट्रात झालेल्या हिंसक “दलित”
आंदोलनाच्या मागे “नक्षलवादी शक्ती” सक्रीय असल्याचा तत्कालीन महाराष्ट्र
पोलीसांचा रिपोर्ट तत्कालीन “आघाडी सरकारला” सादर केल्या गेला होता. पण तेव्हा पण
सरकारने त्या “रिपोर्टवर” कानाडोळा केला. आता या निमित्याने हि “अभद्र युती”
सगळ्यांच्या समोर आली आहे.
यात खरी गंमत अशी कि महाराष्ट्रातील तमाम “आंबेडकरी
विचारधारेच्या” लोकांना आपणच “भारतीय संविधानाचे” खरे रक्षणकरते असल्याचा “अभिमान”
अगदी ठासून भरला आहे. तरी प्रकाश आंबेडकर सारखे “आंबेडकरी विचारधारेचे” नेते उघडपणे
या “भारतीय संविधान” न मानणाऱ्या आणि संविधानकृत “भारतीय न्यायव्यवस्थेला”
झुगारणाऱ्या “नक्षली डाव्या” लोकांसोबत मंचावर उपस्थित राहतात आणि वरून या
सगळ्याचा “सामाजिक परिणाम” नाकारतात, म्हणजे हे लोक आता “डाव्या राजकारणा” सोबतच
“डाव्यांच्या दाम्भिकपणात” पण पुरते मुरले
आहेत याची जाणीव जास्त भीतीदायक आहे.
खरे तर प्रकाश आंबेडकरांनी त्याच्या पुण्यातील कार्यक्रमाला
उमर खालिद सारख्या “संविधान” न मानणाऱ्या माणसाला कसे बोलवीलले याचे दुख: करायचे
कि “मुस्लीम पर्सनल कायद्याच्या” ज्यांना भारतीय संविधाना पेक्षा पण त्यांचे
“धार्मिक कायदे” प्राणप्रिय आहे अशांसोबत मंचावर उपस्थित राहिले म्हणून दुख:
करायचे. इतकेच नाही तर आजच्या "महाराष्ट्र बंद" समापन करतांनाच्या पत्रकार परिषदेत याच्या सोबत येथील वामपंथी प्रकाश रेड्डी सोबत होते. या सगळ्या प्रकरणात काय काळबेर आहे त्याचा योग्य धांडोळा तर राज्य सरकार
घेईलच, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या विरोधात होते अश्या “वामपंथी”
विचाराच्या लोकाच्या मागे फरफटत जाण्याची तयारी आहे का ? याचा विचार पण सच्च्या “आंबेडकरी
कार्यकर्त्याने” करायची वेळ आली आहे.
होय "भगवा" तुमच्या मते "विकृत" असेल ते मान्य केले तर मग ......."उमर खालिद" सारख्या लोकांना बोलावून "निळा" विकृत करायचा प्रयत्न कुणाचा??? "उमर खालिद" "मुस्लिम पर्सनल लॉ" वाले "भारतीय संविधान" मानतात असे त्याच्या सोबत मंच विभागणारे प्रकाश आंबेडकर हामी देतात काय???
की, स्वतः च्या "राजकीय फायद्या साठी" हा सगळा आटापिटा आहे????
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा