रामजन्मभूमी आणि जेरुसेलम










              

             ज्यू लोक २००० वर्षे ज्या साठी “इस्लामी” लोकांशी लढत होते ते स्वप्न या आठवड्यात पूर्ण झाले ते म्हणजे “जेरुसेलम” या शहराला आज इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता मिळाली. 

             हा निर्णय भारतातील पुरोगामी आणि तसेच जागतिक पुरोगमि लोकांना आवडला नाही आहे. कारण सरळ आहे. इस्रायल तसाही या लोकांच्या डोळ्यात सतत खुपत होता. गेल्या काही वर्षात तर “इस्लामी मूलतत्ववाद” वाढण्याचे मुख्य कारण अमेरिका आणि इस्रायल आहे याचा जोरदार प्रसार तर केल्या गेलाच पण जागतिक मुस्लिमांच्या मनात या दोन देशांची प्रतिमा “खलनायक” म्हणून नोंदवण्यात पण या लोकांना यश आले होते. म्हणूनच संपूर्ण जगात इस्लामचे सगळ्यात मोठे शत्रू म्हणून अमेरिका आणि त्या हून जास्त इस्रायल समोर आले. या वादाला समोरे जायचे असेल तर आपल्याला प्रथम याच्या इतिहासात शिरायला हवे.

            “इस्रायल” ची भूमी खरे तर ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यू या सगळ्या धर्मासाठी महत्वाची आहे. या भूमी वरून या तिन्ही धर्माची सुरवात झाली, त्या तील सगळ्यात जूना धर्म म्हणजे “ज्यू”. हा इतिहास म्हणजे धार्मिक आणि ऐतिहासिक गोष्टीची श्रुंखला आहे. यात पूर्ण न जाता यातील महत्वाचे दुवे आपण लक्षात घेऊन त्याची आधुनिक इतिहासाशी नाळ कुठे आहे याचा शोध घेऊ.


             ईसा पूर्व ११ व्या शतका पासून “ज्यू” चे राज्य होते. त्याच्या धार्मिक आणि ऐतिहासिक सोलोमन राजाचे (पहिले आणि दुसरे) मंदिर तिथे होते. हि “ज्यू”ची पवित्र भूमी होती. जवळपास १०० वर्षे राज्य केल्यावर “रोमन साम्राज्याच्या” दबावाखाली “ज्यू” पहिल्यांदा भरडल्या गेले आणि त्याचे या भूमी वरून “पलायन” सुरु झाले. ६३८ साली हा भाग मुस्लिमांनी जिंकला आणि १५१७ मध्ये हा भाग ओटोमान साम्राज्याचा भाग झाला आणि “ज्यू” ची परिस्थिती इथे अजून खालवली. बहुसंख्य “ज्यू” इथून परागंदा होऊन जगभर पसरले. पण “ख्रिस्ताच्या” मृत्यूचे पातक डोक्यावर असल्यामुळे “ज्यू” चे जगातील प्रत्येक देशात हालच झाले. काही भारतात पण आले ते ओळखल्या गेले “बेने इस्रायली” म्हणून. भारतात त्यांना धार्मिक दृष्ट्या हिंदूंनी चांगली वागणूक दिली, इथल्या “ज्यू” ना भारतात धार्मिक अत्याचाराला सामोरे जावे लागले नाही.   

                 या सगळ्या पाश्र्वभूमी वर अनेक स्थित्यातरे होत आणि अनेक प्रकारे लढे देत कधी मित्राचे शत्रू मध्ये होणारे रुपांतरे बघत आणि त्याला लढे देत २९ नोव्हेबर १९४७ साली पालेस्तीनचे दोन भागात फाळणी करत “इस्रायल” हे राज्य जन्मास आले या नवीन देशाला “सयुक्त राष्ट्रसंघाचे” सदस्यत्वं ११ मे १९४९ ला मिळाले. त्याच वेळेस धार्मिक आणि ऐतिहासिक “जेरुसेलम” शहराचे पण दोन भाग केल्या गेले, तसे संपूर्ण शहर “सयुक्त राष्ट्र संघाच्या” अधिपत्याखाली आले.

                   खरे तर जेरुसेलम शहराच्या पूर्वेचा भाग खर्या अर्थाने इस्रायलच्या आधिपत्याखाली आहे. अधिकृत पणे इस्रायलची राजधानी “तेल अवीव” शहर असले तरी, इस्रायलच्या अनेक सरकारी आणि न्यायिक इमारती याच शहरात आहे. आता अमेरिकेने आपले दूतावास अधिकृतपणे “जेरुसेलम” ला हलवून या शहराला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली आणि जगात पुन्हा नव्या वादाला सुरवात झाली.


                   
                 पण या मागे फक्त “इस्रायल” ची दादागिरी नाही तर बदलते जागतिक राजकारणाचे संदर्भ, “वल्ड ट्रेडच्या आतंकवादी” हल्ल्यानंतर आतंकवादाविषयी बदलेली मानसिकता आणि महत्वाचे म्हणजे अर्थकारणात अरबांच्या “खनिज तेलाची” झालेली घसरण कारणीभूत आहे. पण महत्वाचे म्हणजे योग्य वेळी याचा फायदा घेणारे “ज्यू” राज्यकर्ते यात महत्वाचे आहे. महत्वाचे म्हणजे ज्या “स्वप्नासाठी” गेली २००० वर्षे “ज्यू” माणूस जगातील ज्या कोपर्यात होता तिथे तळमळत होता ते स्वप्न त्याने आज पूर्ण केले ते म्हणजे आंशिक का होईना “जेरुसेलम” त्याने “ज्यू लोकांचा” स्वत:चा देश असलेल्या “इस्रायल” ची राजधानी बनविली.

                पण या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतातील सगळ्यात जास्त गाजत आलेल्या “रामजन्मभूमी” बद्दल काय स्थिती आहे.


                 “रामजन्मभूमीचा वाद” जर १९९२ पासून भा.ज.प. आणि संघ परिवाराने आपल्या राजकीय स्वार्थासाठी सुरु केला असे ज्यांना वाटते ते खरोखर मूर्खाच्या नंदनवनात राहतात असेच म्हणावे लागेल. कारण “रामजन्मभूमी” चा वाद १५२८ पासूनचा आहे जेव्हा बाबरचा सेनापती “मीर जाफर” याने राम मंदिर पडून तेथे “बाबरी मशीद नावाची वास्तू बांधली. या नंतर हिदू आणि मुस्लिमांमध्ये “रामजन्मभूमी” वरून अनेक संघर्ष झाले. १८५३ साली यावर मोठी धार्मिक दंगल पण झाली. पण १८५९ साली तत्कालीन राज्यकर्ते असलेल्या “इंग्रजांनी” या जागेवर निर्बंध लावले. १८८५ साली या वादावरील खटला हा भारतीय  न्यायव्यवस्थेत पोहचला आणि तेव्हापासून या वरील केस न्यायालयात सुरु आहे. बाकी राजकारणांत न जाता प्रत्येक राजकीय पक्षाने हिंदू आस्थेचा नेहमी फायदा घेत हा “रामजन्मभूमीचा” विषय कुजवत ठेवला.

                  याला खरे वळण तेव्हा लाभले जेव्हा ६ डिसेंबर १९९२ ला “कारसेवकांनी” बाबरी मशीद म्हणून जग ओळखायचे ती इमारत पडल्या गेली. भारतभर तेव्हा मोठ्या प्रमाणात धर्मिक दंगली पेटल्या. भा.ज.प. ला याचा नक्कीच राजकीय फायदा मिळला, पण या मुळे सगळ्यात मोठे काम हे झाले कि “हिंदूंना” राजकीय महत्व मिळाले. १९९२ पासून २०१७ पर्यंत या “बाबरी पतना” चा फरक हा पडला कि आतापर्यंत “जाळीची टोपी” घालून “इफ्तारच्या” मेजवान्या झोडणारे नेते किमान निवडणुकीच्या काळात तरी “माथ्यावर टिळा” लाऊन मंदिरात डोक टेकवायला जायला लागले.


                    पण हा फरक जास्त नाहीये खरा फरक तेव्हा पडेल जेव्हा त्या जागेवर खरेच “राम मंदिर” बांधल्या जाईल, आणि “ज्यू” लोकांप्रमाणेच त्याचा विजय होईल. आता बघायचे आहे कि भारतातील “जयचंद” जिंकतात कि करोडो भारतीयांची आस्था.        

टिप्पण्या