“प्रयोगशाळा” नक्की कोणाची??





      
         २००० साली गुजरातमधील “गोध्रा प्रकरणा” नंतर झालेल्या दंगली नंतर पुरोगाम्यांनी एक नवीन शब्दप्रयोग पुढे आणला तो म्हणजे “हिंदुत्वाची प्रयोगशाळा”. गुजरात मध्ये “२०००” मध्ये पुरोगाम्यांच्या मते झालेल्या “न भूतो न भविष्यती” धार्मिक दंगली नंतर पण हिंदुत्ववादी भा.ज.प. ला मिळालेले अभूतपूर्व यश बघून हा “शब्दप्रयोग” समोर आला होता.



       वर वर विचार करता तो प्रयोग काही प्रमाणांत खरा पण असेल असे अनेक भारतीयांना वाटले असेल, कारण कधी नव्हे ते “हिंदू” आपल्या धर्मातील “विवादाच्या मुद्द्यांची”  भाषा न करता एकत्र येऊन एकगठ्ठा मतदान करत आपली ताकद दाखवत होता. पण खरे काय होते ? खरच भा.ज.प. ने गुजरातला अशी काही “हिंदुत्वाची प्रयोगशाळा” बनवली होती का ? तर त्याचे उत्तर “नाही” असे आहे. कारण खरे तर या “तथाकथित पुरोगाम्यांनी” संपूर्ण भारताला त्यांची “सत्तेची प्रयोगशाळा” आधीच बनवले होते. फरक इतकाच होता कि आता त्या प्रयोगशाळेतील “गीनिपिक” स्वत:वर अजून प्रयोग करून घ्यायला तयार नव्हते.



       खर तर या “तथाकथित पुरोगाम्यांनी” भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळवायच्या आधी पासूनच या “प्रयोगशाळेची” सुरवात केली होती. त्याला पहिल्यादा त्याला “हिंदू – मुस्लीम एकता” किंवा “गंगा – जमनी तहजीब” या नावाखाली भारताच्या बहुसंख्य राष्ट्रवादी हिंदू धर्मियांना देशाचे तुकडे होण्याची भीती दाखवत अल्पसंख्यक लोकांना झुकते माप देण्याचे पाप करत सत्तेचे लोणी स्वत: कडे ओढून घेण्यात धन्यता मानली. मग त्यात बहुसंख्य धर्मियांचा काही सबंध नसलेली खिलापत चळवळ” “राष्ट्रवादी हिंदूंच्या” माथी मारणे हा पण “पुरोगामी प्रयोग” नव्हता काय ? किंवा फाळणीच्या वेळेस तत्कालीन बंगाल आणि लाहोर मध्ये “डायरेक्ट आक्शन” च्या नावाखाली जेव्हा मुस्लीम लीग “रक्ताची होळी” खेळत होती तेव्हा “उपवासाला बसून” हिंदूचे हात बांधायचे प्रयोग कोण करत होते? या सगळ्याचा परिणाम म्हणून भारतमातेचा लचका तोडत एक “मुस्लीम देश” उभा राहिला आणि “राष्ट्रवादी हिंदू” नागवल्या गेला.



      
        भारताच्या स्वातंत्र्य नंतर या प्रयोगशाळेमध्ये नवीन पुरोगामी प्रयोग सुरु झाला. त्याचे गोंडस नाव होते “धर्मनिरपेक्ष”! कारण तेव्हा भारताच्या फाळणीच्या भळभळण्याऱ्या जखमेवर “हिंदू मुस्लीम एकतेचा” “एक्सपायरी डेट” संपलेला मलम असर करणार नाही याची जाणीव कॉंग्रेस पक्षाला होती म्हणूनच “धर्मनिरपेक्ष” पणाच्या कापसाच्या बोळ्या मध्ये लपूवून तोच “हिंदू मुस्लीम एकतेचा” एक्सपायरी डेट संपलेला मलम पुन्हा नव्याने वापरात काढला. सोबत या सत्तेचे “लोणी” घ्यायला अजून एक “क्रांतीची” प्रयोगशाळा “डाव्या विचारसरणीने” उभी केली होती. यातील प्रयोग “राष्ट्रा” करता अजून धोकादायक होते. तरी कॉंग्रेसने या सगळ्याकडे काना-डोळा तर केलाच शिवाय वेळोवेळी “राष्ट्रहित” मोडीत काढत आपल्या परीने त्या “प्रयोगशाळेत” आपल्या प्रयोगांची भर घातली.

        

       
           खरे तर “बहुसंख्य हिंदूंची” भीती आणि “इस्लाम खतरे मी है” ची आरोळी देत पुरोगाम्यांनी इतकी वर्षे अल्पसंख्यांक लोकांची “एकगठ्ठा मते” आपल्या पारड्यात पडून घेत सत्ता आणि भ्रष्टाचाराचे लोणी मिळून मिसळून गिळले. या सोबत “डाव्या” पुरोगाम्यांनी पण “हिंदू” मधील सामाजिक असमानतेचा फायदा उचलण्याचे अजून धोकादायक नवीन “प्रयोग” सुरु केले होतेच. पण हे तर अजून “राष्ट्रद्रोही प्रयोग” होते, पण मुळातच डाव्या विचारसरणीतील लोकांना सोवियत रशिया, क्युबा, चीन, उत्तर कोरिया यांचा “राष्ट्रवाद” चालतो पण भारतातील “राष्ट्रवाद” चालत तर नाहीच, पण येथील “राष्ट्रवादीमध्ये” त्यांना “फासिस्ट हिटलर” दिसतात हा चमत्कार फक्त भारतातच होतो. भारतातील सामाजिक असमानतेचा विरोध अनेक “हिंदूत्वंवादी आणि राष्ट्रवादी” सुधारकांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीने केला. पण डाव्या लोकांना ती पद्धत नको तर त्यांना हवी “राष्ट्रविरोधी” रक्तलांच्छित क्रांती, समाजाचे त्यात भले हो अथवा न हो, पण, “सत्तेचे लोणी मात्र आपल्याला चाखायला हवे” हा खाक्या या प्रयोगामागे आहे.



        कॉंग्रेस आणि डाव्याच्या या प्रयोगामुळे भारतात अनेक आतंकवादी, दह्शदवादी, नक्षलवादी, अतिरेकी संघटना जन्माला आल्या आणि त्यांनी भारतातील सामान्य लोकांचे जीवन सतत धोक्यात आणले. हे सगळे प्रयोग करत कॉंग्रेस आणि त्याच्या वर “अमर वेली” प्रमाणे गुंडाळल्या गेलेले डावे यांनी केले. विशिष्ठ धर्माचे मत घेत राज्य करायचे आणि “हिंदू” धर्मात निरनिराळ्या खोट्या भीतीने फुट पडायची आणि राज्य करायचे हा यांचा खाक्या, त्याने “राष्ट्र” कमकुवत होत आहे याची त्यांना फिकीर नव्हती.




       पण “राष्ट्रवादी – राष्ट्रप्रेमी” शक्तींनी या प्रतिकूल काळात आपल्या कामाने “हिंदू” जनतेमध्ये जागरूकता आणली आणि या “राष्ट्रविरोधी प्रयोगांना” सुरुंग लावला. साधारण १९९० च्या दशकांपासून भारतातील जनता स्वत:ला या “गीनिपिक” बनवून घ्यायला नकार देण्यास सुरवात केली आणि या “पुरोगामी प्रयोगांना” चाप बसला. १९९० चा आधुनिक सुधारक हिंदू आता बदलला होता, गुजरात पासून त्याची सुरवात झाली १९१४ पर्यंत भारतातील केंद्रीय सत्ते पर्यंत त्याने मजल मारली. या काळात कॉंग्रस आपले तेज हरवून तर बसलीच पण डावे पण हात चोळत बसले. पुन्हा मुसंडी मारायला म्हणून मग या सगळ्याचे खापर “राष्ट्रवादी” लोकांवर फोडायला नवीन शब्द शोधला तो म्हणजे “हिंदुत्वाची प्रयोगशाळा”.



        पण अजूनही यांचे “प्रयोग” संपले नाहीये कधी ते JNU मधील “राष्ट्र” विरोधी घोषणामधून, तर कधी “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या” नावाखाली “राष्ट्रगीताचा” अपमान करून, तर कधी अतिरेक्याच्या फाशीला विरोध करून, तर कधी “राष्ट्रवादी” लोकांचे खून पडून, तर कधी “क्रांतीच्या” नावाखाली गरीब आदिवासींचे खून पाडत दहशद पसरवत हे “राष्ट्रविरोधी” प्रयोग अजूनही सुरूच आहेत.

       

       
        गुजरात निवडणुकीच्या निमित्याने पुन्हा “हिंदू एकजूटीत” फुट पडण्याचे नवे “प्रयोग” अगदी “जानवे घालून” होत आहेत. आता बघायचे इतकेच आहे कि गुजरात मधील “हिंदू” पुन्हा स्वत:ला या “छद्म पुरोगामी प्रयोगात” “गीनिपिक” बनतो कि या प्रयोगांना नाकारत “राष्ट्र उन्नतीचा” “एकजुटीला” आलेख उंचावतो.

टिप्पण्या