ज्या दिवशी हिंदूंची मतपेटी बनेल तर हे काँग्रेस वाले कोटावरून सुद्धा जानवे घालून फिरतील .
- विनायक दामोदर सावरकर (1944)
२०१७ च्या गुजरात राज्याच्या निवडणुकीत कोण जिंकेल कोण हरेल
हा प्रश्न जरी गहन असला तरी या निवडणुकीने भारताच्या लोकशाहीत सगळ्यात जास्त काळ
राज्य करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाच्या “दांभिकतेचा” बुरखा मात्र टराटरा फाडला. या
मागचा ओंगळ चेहरा समोर येत आहे. या निवडणुकीचा हा एक महत्वाचा मुद्दा नक्कीच ठरू
शकतो.
कॉंग्रेसचे हि दांभिकता आजची नाही तर ती पूर्वपार पाठीका
राहिली आहे. “महात्मा” गांधी यांनी याची सुरवात केली होती. एकतर फक्त मुस्लीम
तृष्टीकरणा साठी भारताचा काही सबंध नसतांना १९२१ मध्ये “खिलापत चळवळीला” पाठींबा
दिला आणि भारतात “इस्लामी मुळतत्ववादी” विचारांची पायाभरणी केली. या चळवळीतून केरळात
उभ्या राहिलेल्या “मोपल्यांच्या बंडातील” हिंदू विरुद्धच्या हिंसाच्राला समर्थन
देतांना “खुदा के बहादूर बंदो कि बहादुरी” हे शब्द वापरले. इतकेच नाही तर १९२६
मध्ये “आर्य समाजाचे” नेते स्वामी श्रद्धानंद यांचा खून करणाऱ्या “अब्दुल रशीद”
नावाच्या मुस्लीम तरुणाला आपला भाऊ म्हंटले होते. बर हे सगळ करत असताना “हिंदुना”
महात्मा गांधी “रामराज्याचे” आणि “गोहत्या बंदीचे” स्वप्न दाखवत होते हा त्यांच्या
आणि कॉंग्रेसचा हि दांभिकपणा नव्हता काय ??
कॉंग्रेसचे नेते आणि भारताचे पहिले पंतप्रधान हे पण दांभिकपणात मागे नव्हते. एकीकडे भारतातील “जनक्षोभ” लक्षात घेऊन “आझाद हिंद सेनेच्या” अधिकार्याव्रील खटले लढायला उभे राहिल्यावर, हेच नेहरू पंतप्रधान झाल्यावर त्याच “आझाद हिंद सेना” उभारणाऱ्या सुभाषबाबूंना “ब्रिटन” चा शत्रू म्हणून मान्यता देतात आणि त्याच्या घरावर “गुप्तहेरांचा” पहारा बसवतात. हा पण दांभिकपणा नाहीये का ??
संपूर्ण देशाला “लोकशाही” आणि “अभिव्यक्तीच्या
स्वातंत्र्याचे” डोज पाजणार्या काँग्रेसजनांना १९७५ साली इंदिरा गांधी यांनी
देशावर लादलेल्या “आणीबाणीचे” समर्थन करतांना लाज नाही वाटत. त्या नंतर दिलेल्या “गरिबी
हटाव” च्या नार्याने नक्की कुणाची गरिबी दूर झाली हा पण संशोधनाचा विषय होईल.
इतरांच्या भ्रष्टाचारावर बोलतांना स्वत: च्या नेहरू कालीन “जीप घोटाळया” पासून “नगरवाला
प्रकरणा” मार्गे “बोफोर्स ते प्रतिभूती” घोटाळे विसरणारी कॉंग्रेस हि दांभिकच नाही
काय ??
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी तर या दांभिकतेचे सगळे
उच्चांक मोडीत काढत आहेत. यांनी “लोकशाही” “भष्टाचार” “धर्मनिरपेक्षतेच्या” नावाखाली
जे काही दिवे लावले त्या पाई कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनी आजपर्यंत केलेली पाप हि
छोटी वाटायला लागली. विशेषत: “हिदुत्ववादी” पक्ष म्हणून भा.ज.प. चा केलेला दुस्वास
आणि निंदा, आणि “गोधरा प्रकरणा” नंतर नरेद्र मोदी आणि गुजराती हिंदू जनता याच्या
बद्दल काढलेले “मौत का सौदागर” “खून के दलाल” सारखे शब्द असो, कि राहुल गांधी यांनी
अमेरिकन प्रतीनिधी समोर,” मौलाना हाफिज सैद पेक्षा भारतातील “हिंदू आतंकवाद” जगाला
जास्त धोकादायक आहे.” सारखे वाक्य असो. नसलेला “हिंदू आतंकवाद” सिद्ध करायला तर
सगळे काँग्रेसी इतके उतावीळ होते कि त्याचे परिणाम काय होतील याचा साधा विचार
राहुल गांधी आणि त्यांच्या सल्लागारांनी केलेला दिसला नाही. भारतातील हिंदू
मुस्लीम दंगलीचा इतिहास कितीही जुना असू द्या आणि त्याची कारण काही पण असू द्या, पण
राहुल गांधी करता भारतातील दंगलीचा इतिहास हा “२०००” सालापासूनच सुरु व्हायचा आणि
कारण “नरेंद्र मोदीच” असायचे. खूप जुने जाऊ द्या आत्ता काही महिन्यापूर्वी
झालेल्या उत्तर प्रदेश राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी जाळीदार टोपी
घालून मिरवत होते. “मंदिरात जाणारे फक्त पोरींना छेडायला मंदिरात जातात” असली
व्यक्तव्ये करून हिंदूंच्या भावना दुखवणारे “राहुल गांधी” आज गुजरात मध्ये मंदिर-मंदिर
माथा टेकवून राहिले. स्वत: ला “शिवभक्त” म्हणून जनतेसमोर प्रगट करत आहे. इतकेच
नाही तर आज सोरटी सोमनाथाच्या दर्शना नंतर त्यांना त्यांची “उच्च वर्णीय जात” पण
आठविली आहे. JNU च्या “राष्ट्रविरोधी” घोषणाना समर्थन देणारा, चीन सोबत “डोकलाम
विवाद” भरात असतांना लपत छपत चीनच्या राजदूतांना भेटणारा आणि प्रकरण बाहेर आल्यावर
खोटार्डेपणा करत ती भेट नाकारणारा राहुल गांधी आणि कॉंग्रेस यांनी आजपर्यंत
केलेल्या दांभिकपणाचा हा कळस नाहिये का ??
खरे तर कॉंग्रेसचे हे “दांभिक” रूप स्वातंत्र्यवीर
सावरकरांसारखे द्रष्टे नेते चांगलेच जाणून होते म्हणून त्यांनी लेखाच्या आधी
दिलेले वाक्य बोलले होते तरी “हिंदुना” या वाक्याची प्रचीती यायला २०१७ साल
उजाडावे लागले, आता तरी “हिंदू” जनतेने धडा घ्यावा आणि कॉंग्रेस आणि त्याच्या
नेत्यापासून सावध राहावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा