क्षेपणास्त्रा जन्म

                             
     आजकालच्या आधुनिक काळात लढाया फक्त जमिनीवरून नाही तर आकाशातून पण लढवल्या जातत विमान वगैरे गोष्टी जुन्या झाल्या आता रॉकेटचा जमाना आहे. जगातील प्रत्येक देश मिसाईल बनवायच्या आणि मिसाईल तंत्रज्ञान अधिकाधिक आधुनिक बनवण्याच्या उद्योगात आहे.

                                    यात भारत पण मागे नाही भारतानेही पृथ्वी, आकाश, अग्नी, ब्रम्होस सारखी अत्याआधुनिक मिसाईल बनवून या तंत्रज्ञानांत आपण जगाच्या पाठी नाही हे दाखवून देत आहे. पण तुम्हाला माहित आहे जगाला या तंत्रज्ञानाची ओळख कुणी करून दिली.
           
                                  आज जरी मिसाईल तंत्रज्ञानात अमेरिका, रशिया, आणि इग्लंड सारखे देश पुढे असले तरी जर्मनीतील एक इंजिनीअर वार्नर वन बार्न याला सागळ्यात पहिले हे तंत्रज्ञान महत्वाचे वाटले. त्याने तत्कालीन जर्मनीचा सर्वेसर्वा हिटलरला या वर पैसे लावायला पटवल.

                                   बाल्टिक समुद्रा किनारी असलेल्या पेन्मुडे गावात १९३५ साली पहिल्यादा इंजिनीअर वन बार्न पोहचला आणि जर्मन मधील एक निसर्ग सौंदर्या करता प्रसिध्द असलेल्या या गावच भाग्य बदलल...... १९३६ ते १९४४ हे गाव जर्मनीच्या एका गुप्त मिशनच साक्षीदार ठरल.

                                  हे गाव पसंद करायचं अजून एक कारण म्हणजे या गावाच्या ४०० किलोमीटर आजूबाजूला लोकवस्ती नव्हती मिसाईल लॉचपॅड आणि टेस्टिंग साठी हि जागा अगदी आदर्श अशी होती. जवळजवळ १२००० लोकांना दिवसरात्र कामाला लावत इथे जगातील पहिला क्रुझ मिसाईल बनवणारा कारखाना आणि लॉचपॅड आणि टेस्टिंग पॅड १९३६ मध्ये उभा राहिला. याचा खुपसा उपयोग दुसर्या महायुद्धात झाला नसला तरी. नंतर माणसाला अंतराळात जाण्यासाठी हेच तंत्रज्ञान कामात आले.

                                १९३९ मध्ये जेव्हा दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा हा कारखाना पूर्ण सुरु झाला नव्हता तंत्रज्ञान पण प्राथमिक अवस्थेत आणि चाचणीच्या पातळीवर होते. पण महायुद्ध सुरु झाल्यामुळे खर्चाच्या प्राथमिकता बदलल्यामुळे या मिशन करता होणार्या संशोधन खर्चाला कात्री लावण्यात आली.

                                तरी पण या सगळ्या संकटानवर मात करत १९४२ मध्ये डॉर्नबर्गर आणि वन बार्न या दुकलीने पहिल्यांदा A-4 या क्रुझ मिसाईल सफल परीक्षण केले. मग सुरु झाली दुसरी लढाई हे तंत्रज्ञानाचे महत्व हिटलरला पटवून द्यायचे. शेवटी १९४३ मध्ये हिटलरने युद्धा करता मिसाईल निर्माण करायची परवानगी दिली आणि अत्यंत गुप्त रीतीने ज्यू युद्धबंदी च्या मदतीने इथे मोठ्या प्रमाणावर मिसाईल निर्माण करण्याचे काम सुरु झाले. पण तो पर्यंत जर्मनीची युद्धात अनेक आघाड्यावर पीछेहाट सुरु झाली होती.

                         पण दोस्त राष्ट्रांच्या गुप्तहेरांच्या नजरेतून या गावाची लगबग लपू शकली नाही. नक्की काय सुरु आहे हे जरी कळले नसले तरी काहीतरी “भयानक हत्यार” तयार होत असल्याचा रिपोर्ट इग्लंडला पोहचला. त्या मुळे १७ ऑगस्ट १९४३ ला या पेन्मुडे गावावर “ऑपरेशन हाईड्रा" नावाने (नाव ओळखीचे वाटते न.......होय तेच “हाईड्रा गुप्त मिशन” ज्याच्याविरोधात “काप्टन अमेरिका” लढतो) रॉयल ब्रिटीश एअरफोर्स ने जबरदस्त हमला करत बॉम्ब टाकले. मिशन खूप काही सफल झाले नाही. पण मिसाईल बनवण्याचे काम हळू झाले आणि कारखाना पेन्मुडे गावातून जर्मनीतील “मितेलवर्क” या शहरात हलवण्यात आला आणि त्या वेळे नुसार अत्याधुनिक V2 मिसाईलचा जन्म झाला.

                                            २० जुन १९४४ रोजी V2 ची पहिली चाचणी झाली.

                                            १२००० किलो वजन, ४५ फूट ११ इंच उंचीचे, ५ फूट ५ इंच गोल असलेल्या आणि १००० किलोग्राम वॉरहेड घेऊन, लिक्विड ओक्सिजन वर चालणारे ३२० किलोमीटर रेंज असलेले आणि ५७६० किलोमीटर प्रती तास या वेगाने जाणारे पहिले V2 मिसाईल इग्लंड वर सप्टेंबर १९४४ मध्ये पडले आणि मित्र राष्ट्र अचंभित झाले. जवळ जवळ ३००० V2 इंग्लंड, Antwerp, Liege या शहरांवर पडले. १९४४ ला हिटलरला या आधुनिक अस्त्राचे महत्व पटले आणि त्यांनी व्रीर दोन्ही इंजिनीअरची माफी पण मागितली वेळेवर आर्थिक मदत दिली नाही म्हणून पण तो पर्यंत उशीर झाला होता जर्मनी युद्ध हरले होते.

                                             १९५५ पर्यंत V2 ला कोणताही पर्याय नव्हता. महायुद्धात जर्मनी हरल्यावर या तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या वैज्ञानिकांना अमेरिका, सोवियत रशिया, इग्लंड, फ्रांस या देशांनी आश्रय दिला आणि अजून एक नवीन युद्ध सुरु झाले याच्या आधुनिकीकरणाचे.

टिप्पण्या