"इस्लामी आक्रमण" हे "धार्मिकच"



               आजकाल कोण पण उठतो तो “हिंदुत्व” आणि त्यांनी “खोटा इतिहास” यावर भाष्य करत सुटतो. राम पुनिया सारखे थोर साम्यवादी इतिहासतज्ञ तर भारतात आक्रमण करून आलेल्या “इस्लामी आक्रमकांच्या” तर प्रेमात पडले आहेत. त्या मुळे त्यांनी त्याच्या धर्माच्या शिकवणी नुसार नाही तर फक्त “लुटी” करता मंदिर फोडली असे म्हणतांना काही आता अस्तित्वात असलेल्या मंदिराची उदाहरण पण देतात. पण हे तद्दन दिशाभूल करणारे आणि सत्य परिस्थिती पासून खूप दूर विधान आहेत. 

                 पण याच मुळे इतर सामान्य लोकांच्या मनात अनेक प्रश्न घर करतात, मग त्यांना वेगवेगळ्या मंदिराबाबत प्रश्न पडायला लागतात आणि माझ्या मते ह्यात काही गैर नाही. 

                भारतातील “इस्लामी” आक्रमण हे खर तर युरोप मध्ये केलेल्या आक्रमणाला झालेल्या प्रखर प्रतिरोधा नंतर झाले. सोबत भारतात असलेल्या संपन्नतेच्या कहाण्या “अरबी व्यापारी” आणि भारताच्या पश्चिम सीमेपर्यंत पसरत आलेल्या इस्लामी सुलतानांनी सगळी कडे पसरवल्या. त्याच मुळे “मुहम्मद गजनी” प्रथम फक्त लुटीच्या इराद्याने आला, त्याने “सोरटी सोमनाथ मंदिर” १७ वेळा लुटले हे सर्वश्रुत आहे. पण तो खरे तर “राज्य करायच्या” आणि “इस्लाम पसरवण्याच्या” इराद्याने येत नव्हता, पण रस्त्यात तो या दोन्ही गोष्टी करतच होता. मग मात्र “मोहम्मद घौरी” या पासून “इस्लामी आक्रमक” राज्यकर्ते म्हणून जम बसवायला लागले आणि थेट ओरांगजेब पर्यंत मंदिर पडण्याचा एक वेगळा इतिहास भारतात तयार झाला.

                  बर, हे सरसकट भारतातील सगळी मंदिर पाडत होती का ? तर याच उत्तर नाही असे आहे, कारण भारतातील सगळी मंदिर पडायची, आपला धर्म बळजबरीने पसरवायचा आणि राज्य करून आपला धाक निर्माण करायला भरपूर मनुष्यबळ लागले असते, युद्ध घरा घरात लढले गेले असते, म्हणजे प्रतिकार वाढला असता आणि त्या मुळे वेळ सुध्दा जास्त लागला असता. त्याच बरोबर तत्कालीन “इस्लामी इतिहासकरांना” त्याच्या युरोप मध्ये केलेल्या चुकांचा “धडा” पण सोबत असेलच ज्या मुळे जिंकलेले स्पेन त्यांना कायमचे गमवावे लागले.

                  तर त्यांनी काय केले तर “हिंदूची” सगळ्यात जास्त “श्रद्धा” आणि “राबता” ज्या मंदिरात जास्त आहे त्याला निशाना बनवले. याने दोन गोष्टी साध्य होत होत्या १) आपण ज्याच्या विश्वासावर जगतो, त्याला आपल्या डोळ्या समोर भंगताना बघितल्यावर, आपला त्याच्यावरील विश्वासपण डळमळीत होतो. २) एकदा विश्वास डळमळीत झाला कि आपला स्वतः वरील पण विश्वास पण कमी होतो, म्हणजे तो एका अर्थी आपण “गुलामगिरी” कडे सरकतो. विश्वास, अस्मिता घालवल्यावर धर्मात राहते काय ?

म्हणून आपण काही मंदिरांचा इतिहास बघू.........




काशी विश्वनाथ मंदिर – “मोहम्मद घौरी” यांनी नेमलेल्या आणि भारतात “इस्लामी” राजवट स्थापित करणारा “कुतुमुद्दिन एबक” याने हे मंदिर पाडले. काशी या शहरा सोबत तेथील मंदिराचे काय महत्व आहे हे काही कोण्या “हिंदू” भाविकाला सांगायला नको थेट देवाधिदेव शंकर या शहरात राहत असल्यामुळे या मंदिराला पुराण काळा पासून अनन्य साधारण महत्व होते. त्या मुळेच “इस्लामी आक्रमकांनी” तोडलेल्या मंदिरात हे पहिले मोठे मंदिर. हे मंदिर फक्त तोडलेच नाही तर या ठिकाणी मशीद पण बांधली. राजा तोरडमल याने हे मंदिर पुन्हा बांधले पण औरंगजेब याने हे मंदिर पुन्हा पाडले, पण “मराठा साम्राज्य” भरात आल्यावर इदौरच्या देवी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे पुनर्जीवन केले आणि मंदिरात पुन्हा अनेक दशका नंतर “पूजा अर्चा” सुरु झाली. शीख राज्य स्थापन करणारे राजा रणजितसिंग यांनी या मंदिराच्या कळसावर सोन्याचा पत्रा लावला होता.


मथुरा येथील कृष्ण मंदिर – हे मंदिर मोहम्मद गजनी याने प्रथम लुटलेहि आणि फोडलेही, नंतर अनेक वर्षे वेगवेगळ्या “इस्लामी आक्रमकांनी” वेळोवेळी हिंदुनी उभारलेले हे मंदिर पाडले. शेवटी पुन्हा औरंगजेबाची नजर या मंदिरावर पडली आणि त्याने हे मंदिर पडून इथे मशीद उभारली. नंतर कधी तरी या मशिदीच्या मागे पुन्हा मंदिर उभारले गेले, जे आज आपण बघतो.



राम मंदिर – रामजन्मभूमी अयोध्या येथील राम मंदिर १५२७ साली बाबरचा सेनापती मीर जाफर यांनी पाडले आणि तिथे “बाबरी मशीद” बांधली. हा विवाद तर अजून सुरु आहे. 

हम्पी – कर्नाटकातील “विजय साम्राज्या” ची राजधानी बहामनी सुलतानाने या मंदिराने सजलेल्या राजधानीची केलेली दुर्दशा आजही आपल्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो.



नाशिक आणि त्र्यंबकेश्वर – नाशिक हे भारतातील कुंभ मेळयाचे एक महत्वाचे ठिकाण तसेच जवळच असलेले ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर हे दोन्ही ठिकाणे वेळोवेळी “इस्लामी आक्रमकांना” बळी पडलेले आहे. शेवटच्या माहितीत पुन्हा औरंगजेबानेच या दोन्ही ठिकाणी नासधूस केली. यातील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जीर्नोधाराचे काम नानासाहेब पेशवे यांनी तर नाशिक परिसरात मराठा साम्राज्याच्या प्रत्येक सरदाराचा हात लागला आहे.



कोणार्क सूर्य मंदिर – याची सगळ्यात जास्त नासधूस बंगालच्या सुलतानाचा सुभेदार “काळा पहाड” याने केली आहे. पण त्याच बरोबर इंग्रज, डच, पोर्तुगीज यांनी पण केली.
 
    
                 वर काही राष्ट्रीय आणि क्षेत्रीय “हिंदू” मंदिरांची झालेला विध्वंस कसा झाला कोणी केला याची उदाहरण दिली आहे. यातील हम्पी सोडल तर प्रत्येक मंदिर हे पुराणकाळा पासून “हिंदुच्या” श्रध्देचा भाग होते आणि प्रत्येक काळात अत्यंत समृद्ध आणि सतत भक्त यात्री लाभलेले होते याला आपण नाकारू शकत नाही. अशा ठिकाणी आघात केल्यावर “हिंदू” लोकांच्या अस्मिता आणि विश्वासाला त्या काळात जबरदस्त धक्का लागला असेल यात पण दुमत असण्याचे कारण नाही.


               दिल्ली येथे दिमाखात उभा असलेला आणि युनोस्को नुसार जागतिक वारसा असलेला "कुतुबमिनार" हा कुतुबुद्दीन एबक याने तत्कालीन "हिंदू" दिल्लीतील २७ हिंदू आणि जैन मंदिर पडून त्याच्या मलब्यातून उभा केलेला आहे. याच्या खुणा अजूनही तेथे बघायला मिळतात.

                 आता काही ठिकाणी चांगल्या स्थितीत असलेल्या मंदिर आणि लेण्या त्या का तश्या राहिल्या याचा इथिहास बघू.


राजपुताना मधील अनेक मंदिरे – राजपुताना मधील राजांनी मुस्लीम आक्रमकांना पहिले चांगले लढे दिले पण एका मागून एक आक्रमणे यात गुतून राहण्या पेक्षा यांनी मुघलांशी तह केला आणि आपली राज्ये वाचवली. म्हणून मग तेथे नंतर मुस्लीम आक्रमणे झाली नाही आणि तेथील मंदिरे सद्स्थितीत राहिली.

दक्षिण भारतातील मंदिरे – इस्लामी सत्ता उत्तर भारतातून दक्षिणेत येउन स्थिर व्हायला कालावधी लागला. नंतर बहामनी साम्राज्याने दिल्लीचे वर्चस्व झुगारून दिले. त्या मुळे दक्षिणेत त्यांना बर्याच वेळेला सामंज्यास्याचे धोरण स्वीकारावे लागले. सोबत लवकरच इथे मराठा साम्राज्याची स्थापना झाली आणि ते उत्तरेपासून दक्षिणे पर्यंत स्वत:चा ठसा उमटवू लागले.

                            तरी भारतातील आज सुस्थितीत दिसणारी मंदिरे हि एक तर शिवाजी महाराजापासून शेवटल्या बाजीराव पेशव्यापर्यंत अनेक मराठा साम्राज्यातील सरदारांनी आणि स्वत: राजांनी केलेल्या जीर्नौद्धारापाई उभे आहेत किवा त्यांनी बांधलेली आहेत.

                          तर काही ठिकाणे कित्येक शतके लोकांच्या नजरेतून सुटलेले राहिले किवा ती मंदिरे अत्यंत दुर्गम भागात असतील उदाहरण – बद्रीनाथ, केदारनाथ त्या मुळे ती आक्रमकांच्या नजरेतून पण सुटली. त्याच बरोबर तेव्हा त्या काळात जनमानसामध्ये त्या त्या मंदिरा करता श्रद्धा किवा संवेदना प्रकर्षाने दिसल्या नसतील म्हणून त्यांना काही केले गेले नाही हे पण सत्य आहे. तीच प्राचीन मंदिर आज आपल्याला चांगल्या स्थितीत दिसतात.

टिप्पण्या