हे "सिलेक्टिव्ह अभिव्यक्ती स्वातंत्र्य" कशाला ???


पद्मावती” चित्रपटावर सुरू झालेला वाद आता अधिक रंगददार होण्याची चिन्हे दिसत आहेत. या चित्रपटाच्या विरोधात राजस्थान मधील “करणी सेना” नावाच्या संघटनेने प्रथम मोर्चा उघडला, त्या बरोबर “हिंदुत्वा” च्या प्रश्नावर नेहमीच उभा होणाऱ्या भा.ज.प. ने पाठींबा देण्यास सुरुवात केली आहे.

या वादा च्या निमित्याने “सोशल मीडिया” वर पण तुफान टोलेबाजी सुरू आहे. त्यातल्या त्यात यातील कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या कोण्या तथाकथित “हिंदु” संघटने कडून आल्यावर तर या “सोशल मीडिया” तील टोलेेबाजील अजून उधाण आले आहे. कोणी याला “हिंदु असहिष्णुता” म्हणून बघत आहे, तर कोणी “हिंदू तालिबान”. मात्र “हिंदू” विरुद्ध हे सगळं लिहितांना काही महत्वाच्या विरोधाभासांकडे “हिंदूं” विरुद्ध लिहनारे कायम दुर्लक्ष करतात. तेच दाखविण्याचा प्रयत्न करत आहे.

प्रथम हे “स्वच्छ शब्दात” स्पष्ट करू इच्छितो की कोणत्याही प्रकारे या चित्रपटाच्या वादावर या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांना “जीवे मारण्याची” धमकी देणे याला माझं आता “समर्थन नाही” आणि कधीही “असणार नाही” पण तरीही अशी वेळ का येते याचा थोडा विचार आपण करायला हवा अशी इच्छा.

“धर्म” ही अफूची गोळी मानणारा जागतिक “साम्यवाद” असू द्या, की “सर्वधर्म समभाव” याचे गुणगान गाणारा भारतातील काँग्रेस आणि इतर पक्ष असू द्या, या पैकी कोणताही पक्ष असा नाही की त्याने जागतिक किंवा देश पातळीवर “अस्मिते” वरून कोणताही चित्रपटाला विरोध कधी केला नाहीये.

“पद्मावती” वर जो विरोध होत आहे त्यात धार्मिकतेचे राजकारण खर तर कमी आणि अस्मितेचे जास्त आहे हे प्रथम लक्षात घ्यावे लागेल.

“अभिव्यति स्वातंत्र्या” च्या नावाखाली याच “अस्मितेला” वेठीला धरण्याचा प्रयत्न होत आहे अशी लोकांची भावना तयार होत आहे आणि ही “अस्मिता” जाणून बुजून “हिंदूंचीच” ही यातील दुसरी भावना, याला खतपाणी घालणारे कोण ? याचा शोध घेतल्यावर, याला कारणीभूत स्वतः “अभिव्यक्ती” स्वातंत्र्याचे पाईक म्हणून आशा वादात समोर येणारे दांभिक आहेत हे लक्षात येईल.

हे कसे ते बघा……

काही वर्षांपूर्वी एक इराणी दिगदर्शक मजिद माजिदी याने एक चित्रपट बनविला “मुहम्मद - दि मेसेंजर ऑफ गॉड” या चित्रपटाला संगीत दिले होते भारतीय संगीत दिगदर्शक आणि ऑस्कर अवार्ड विजेते ए. आर. रहमान यांनी. पण हा चित्रपट भारतात येऊ शकला नाहीच पण या चित्रपटाला संगीत दिले म्हणून संगीतकार रहमान याच्या विरुद्ध “फतवे” जरूर निघाले. याचा विरोध इतका होता की विकपीडिया वर माजिद माजिदी याच्या चित्रपट कारकिर्दीच्या रकान्यात या चित्रपटाचे नाव पण नाहीये.
असे विवादित काय होते या चित्रपटात?? तर काहीच नाही, तरी या चित्रपटाला भारतात तुम्हा आम्हाला (म्हणजे हिंदूंना) न कळता इतका विरोध झाला की हा चित्रपट भारतात प्रकाशित झाला नाही, या विरुद्ध ना कोणते पक्ष काही ओरडले, ना भारताच्या “सहिष्णू” छविला धक्का लागला, ना कोणत्या “वृत्त वाहिनी” वर या वर चर्चा सत्र चालले. आता विचार करा की, कोणा भारतीयाने हा चित्रपट बनवला असता तर काय परिस्थिती इथे निर्माण झाली असती??

यात गंमत अजून अशी की “अभिव्यक्ती”च्या कट्टर समर्थक कलाकार विदुषी शबाना आझमी ज्या आज “पद्मावती” च्या समर्थनार्थ ट्विट करत आहेत आणि या सगळ्या प्रकाराला “अभिव्यक्ती” विरोधी अभियान सांगून देशात वाढणाऱ्या “असहिष्णुते” विरोधात आपले विचार व्यक्त करत आहे, याच शबाना आजमी याना तेव्हा “माजिद” यांची “अभिव्यक्ती” मंजूर नव्हती का??

हा वाद “पद्मावती” चित्रपटा पेक्षा ही या चित्रपटाला बनवणाऱ्या दिगदर्शकाच्या म्हणजे “संजय लीला भन्साळी” याच्या वरील अविश्वासाचा अधिक आहे आणि याला कारणीभूत स्वतः संजय लीला भन्साळीच जास्त कारणीभूत आहे. या महाशयांनी आता पर्यंत केलेली कामे त्याचे वाद समोर आणत आहे. खर तर विदू विनोद चोप्रा सारख्या दिगदर्शकाचा सहायक म्हणून गाजलेल्या “1942 अ लव्ह स्टोरी” सारख्या चित्रपटा पासून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या आणि काही प्रमाणात चांगले चित्रपट देणाऱ्या माणसाचे जुन्या गोष्टी आणि ऐतिहासिक व्ययक्तिमत्वा कडे लक्ष गेले आणि भन्साळींची लय बिघडली.

पहिले याने बनवला “देवदास”. शरदचंद्र चटोपाध्यय यांच्या बंगाली कादंबरीवर आधारित हा चित्रपट. पण यात “सिनेमॅटिक लिबर्टी” किंवा “अभिव्यक्ती स्वातंत्र्य” घेऊन या महाशयांनी कथेत लुडबुड केली आणि कथेत नसणारे कथानक यात घुसवले. अर्थात ही काल्पनिक कादंबरी असल्या मुळे फक्त “नाक मुरडण्या” पलीकडे फारसे काही झाले नाही. पण जेव्हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक व्यक्तिमत्व “बाजीराव पेशवे (पहिले) याच्या वर या महाशयाची नजर गेली आणि वाद झाले. ऐतिहासिक तथ्य नसणारे गाणे आणि नाच सोबत खुद्द बाजीरावाला पण करावा लागलेला नाच या वर टीका आणि विरोध झालाच, पण तरी चित्रपट रुजू झाला, महाराष्ट्रीय “ब्राम्हण” हा राजकीय दृष्ट्या झोपलेला असल्याचा फायदा याला झाला. पण “पद्मावती” मुळे याने मधमाश्याच पोळच फोडलं. पूर्ण भारतभर जवळपास 20% पसरलेला राजपूत समाज, राजकीय दृष्ट्या पण सजग आणि कार्यरत असा समाज आहे त्याला अशी ऐतिहासिक महापुरुषांची “सिनेमॅटिक लिबर्टी” अजिबात मंजूर झाली नाही आणि वाद वाढले.

यात गंमत अशी की जे राजकीय पक्ष या चित्रपटाच्या समर्थनार्थ उभे झाले त्यांच्यातही आता विरोधी सूर उमटून राहिले आहेत. काँग्रेसचे पंजाबचे मुख्यमंत्री पण चित्रपटाच्या विरोधात बोलत आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ज्यांना बंगाला देशाची लेखिका “तस्लिमा” यांची “अभिव्यक्ती” भारतात आवडत नाही त्या मात्र “पद्मावती” करता भन्साळी सोबत उभ्या दिसतात, पण त्याच्या मंत्री मंडळातील काही मंत्री मात्र या चित्रपटाच्या विरोधात उभे आहेत.

म्हणजे कोणाला ही सध्या या “राजपुताना” दुखवायचे नाहीये. तरी पण या “अस्मितेच्या वादाच्या” खांद्यावर बंदूक ठेऊन निशाणा मात्र “समस्त हिंदूंच्या” भावनांवर चालवायची, आणि “अभिव्यति स्वातंत्र्य” स्वतःला आवडेल आणि रुचेल या पद्धतीने सांगायचे अश्या दांभिक समाजदेवक, कलाकार याच्यावर किती विश्वास टाकायचा . याच दुतोंडीपणा मुळे हिंदू चिडला तर त्याला लगेच “तालिबानी” म्हणून चिडवायचे हे पण कितपत योग्य आहे याचा विचार करणे पण आवश्यक आहे. असलेच लोक हिंदूंना हळूहळू “तालिबानी” करणाकडे ढकलत आहेत असे तुम्हाला वाटत नाही काय???

टिप्पण्या