केतकी चितळे या अभिनेत्रीने आपल्या समाज माध्यमावर शरद पवार यांच्यावर टीका करणारी कुणी दुसर्याने लिहलेली कडवी टाकली आणि गहजब उडाला. त्यातील भाषा नक्कीच असभ्य आहे यात काही शंका नाही, सोबतच कोणाच्या मरणाची अशी आशा करणे पण वाईटच. मात्र या नंतर केतकी चितळे करता अत्यंत वाईट शब्द वापरत केलेली टीका कशी चालते? समजा केतकी चितळे वर राष्ट्रवादी कार्यकर्ते किंवा शरद पवार समर्थक जी खालच्या दर्जाची टीका करत आहेत, हे त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तर मग तेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य केतकी चितळे हिला का नाकारण्यात येत आहे? या टिके करता तिला सरळ कारागृहात टाकण्याची खरेच गरज आहे का? त्या उप्पर, "शरद पवार यांच्यावर टीका करत, अपमान करणाऱ्या सामान्य माणसाला झोडा" असा आदेश काढणारी आणि त्याला समाज माध्यमांवर टाकणारी राष्ट्रवादी राजकारणाचे तालिबानीकरण करत नाहीये का?
बाकी आधी शरद पवार यांच्या बुद्धीची चमक दाखवणारी एक पोस्ट त्यांचे समर्थक सतत समाज माध्यमांवर सामायिक करत. त्यात कोण्या संस्थेचे अधिकारी, त्यांच्या संस्थेच्या आवारात असलेल्या आणि वाहतुकीस अडसर होणाऱ्या एका वृक्षाला तोडण्याची परवानगी मिळत नाही म्हणून तक्रार घेऊन येतात. शरद पवार पण पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्ष न तोडणे कसे वाईट आणि वृक्ष संवर्धन कसे व्हायला हवे वगैरे गप्पा मारतांना. झाडाला मोरचुद घातला की झाड कसे मरते वगैरे सांगतात. ते अधिकारी बरोबर त्या गप्पातील संदेश बरोबर घेऊन जातात आणि त्यांची समस्या संपते. राज्याचे राजकारण खराब करणारे हेच ते शरद पवार आहेत. बाकी त्यांनी के पेरले तेच आता त्यांच्यावर उलटत आहे.
राज्यात भूखंडाचे श्रीखंडा पासून तेलगी प्रकरणा पर्यंत सगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एक नाव कॉमन होते ते म्हणजे शरद पवार. अगदी शेतकरी हितचिंतक आणि शेतकी प्रश्नांची जाण वगैरे त्यांच्या मागे लावले जात असले तरी, त्यांच्याच राज्यात राज्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे नजरेआड करून कसे चालेल. ऊस उत्पादकांचा प्रश्न असो, की ऊस तोडणी कामगारांचा, किंवा साखर उत्पादकांचा शरद पवार कोणत्याही प्रश्न कायमचा सोडवू शकले नाहीत हे वास्तव नाही काय? कसेही करून आपण सत्तेच्या जवळ राहणे आवश्यक असल्यामुळे त्यांनी वाटेल तश्या कोलांटउड्या घेत राजकारण केले. त्यांच्या समर्थकांच्या मते हेच राजकारण असले तरी सभ्य भाषेत याला राजकारण म्हंटले जात नाही.
बाकी लोकांच्या जाती काढणे, आपल्या आमदाराकरावी जातीय टिपण्या आणि खोट्या जातीय वावड्या उठवणे सारखे कार्यक्रम अधून मधून करणे आणि त्याचा संबंध काहीही कारण नसतांना पुरोगामी विचारांशी जोडत जाणे असली सगळी पाप शरद पवार यांच्या डोक्यावर जमा आहेत.
राज्याच्या जेमतेम साडेतीन जिल्ह्यात प्रभाव टाकणे आणि त्यातील एका गावाचा विकास घडवून आणणे म्हणजे राज्याचा नेता होणे असे तुमचे म्हणणे असेल तर असो, मला तसे वाटत नाही. सतत सत्तेत राहणे किंवा सत्तेजवळ राहणे ही त्यांची मजबुरी झाली आहे.
बाकी शरद पवार राजकीय खेळा साठी सोईस्कर खोटे बोलल्याची आणि वागल्याची अनेक उदाहरणे आहेत. अगदी शेतकरी कायद्या विरोधी आंदोलनात सरकार विरोधात बोलणाऱ्या शरद पवार यांनी संसदेत मात्र सरकारला हे कायदे संमत करायला मदत केली होती. शेतकरी कायदे संमत होतांना राज्यसभेतील राष्ट्रवादीचे संसद सदस्य ज्यात शरद पवारपण आले सगळे अनुपस्थित होते. आपल्या अश्या निर्णयाचा फायदा सरकारला कायदे पारित करायला होणार हे अख्खी हयात संसदेत घालवलेल्या शरद पवार सारख्या वरिष्ठ नेत्याला माहीत नसणार का?
मालेगाव बॉंबस्फोट, कोरेगाव भीमा प्रकरण काहीही हातात नसतांना आपल्या वैचारिक विरोधकांना गोवण्याची संधी घेण्यात शरद पवार आघाडीवर होते. अगदी खोटे बोलून त्यांनी आपला कार्यभाग साधला.
थोडक्यात काय ? तर, सभ्य भाषेत सांगायचे तर माननीय शरद पवार अतिशय नीच वैचारिक पात्रतेचे, अतिशय जातीयवादी आणि खोटारडे राजकारणी आहेत. जसे जसे त्यांचे वय वाढत आहे त्याच प्रमाणे यांचा पाताळयंत्रीपणा पण वाढत आहे. शरद पवार ज्या पद्धतीने राजकारण करतात ती राज्याच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. शरद पवार यांनी राजकारणात पैसा आणला असल्यामुळे अनेक पक्षातील अगदी भाजपा मधील काही नेते पण शरद पवारांना आदर्श मानतात, मात्र ते सगळे नकळतपणे पवार यांच्या भ्रष्ट मार्गाचे समर्थन करतात असे माझे स्पष्ट मत आहे. एकूण काय ? तर शरद पवार यांचे "भावी" स्वप्नांवर वय हावी होत आहे. ती जी काही तगमग, तळमळ आहे ती त्यांच्या राजकारणात दिसत आहे. "रात्र कमी आणि सोंग फार" असले की नैतिक - अनैतिक भेद कळेनासा होतो. इथे तर बुद्धीच भ्रष्ट आहे.
अत्यंत समर्पक लेख. शिवाय अशा घटनेमुळे भारतातील खरे खुरे फासिस्त कोण हे पण उजेडात येत आहे.
उत्तर द्याहटवा