सावध रहा, जागृत रहा..! तालिबान की मानवता प्रश्न तुमचा !



अफगाणिस्थान वर तालिबानी वर्चस्वाच्या धामधुमीत आणि अफगाण मध्ये अडकलेल्या भारतीयांना सहीसलामत वापस आणायचा विचारात आपण एक बातमी विसरलो आहोत.



तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी भारतातून सीरिया - इराक मध्ये इसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या आयेशा (सोनिया सेबीस्टिण ), राफीयेला, मरियाम (मेरिन जेकब ), फातिमा ईसा ( निमिषा ) आणि आरिफ माजित यांच्या विषयी लिहले होते. यातील आरिफ माजित सध्या भारतीय एन आय ए च्या ताब्यात असून, त्याने दिलेल्या महितीवरूनच इसिसच्या भारतातील केरळ आणि काश्मीर मॉड्युलची धूळधाण करण्याचा प्रयत्न करत आहे.



आरिफ मजीद याला आता जामीन मिळावा यासाठी त्याचे कुटुंबीय आणि इतर मुस्लिम संस्था मागणी करत आहे, न्यायालयात लढत आहे. मात्र आरीफने काही प्रमाणात एन आय ए ला मदत केली असली तरी, भारतीय सुरक्षा यंत्रणा आरिफला मोकळे सोडण्याच्या मनस्थितीत नाहीये. या यंत्रणांचा दावा आहे की आरीफने इसिस मध्ये त्याचे जबरदस्त ब्रेन वॉशिंग झाले असून त्याच्या वागण्या बोलण्यावर आम्ही पूर्ण विश्वास टाकू शकत नाही. अश्यात त्याला जामीन मिळाला तर बाहेर पडून तो नक्की काय करेल याचा भरवसा नाही. सुरक्षा यंत्रणेचे हे म्हणने तूर्तास तरी न्यायालयाने ग्राह्य धरले आहे.



मात्र या शिवाय आयेशा (सोनिया सेबीस्टिण ), राफीयेला, मरियाम (मेरिन जेकब ), फातिमा ईसा ( निमिषा )  या पोरीही ज्या भारतातून पळून इसिस मध्ये भरती झाल्या होत्या. इसिसचा पडाव झाल्यावर त्या तुर्कस्थान मार्गे अफगाण मध्ये पोहचल्या होत्या. तत्कालीन काळात अफगाण सरकारने त्यांना अटक करून कारागृहात टाकले होते. या पोरींना पण भारत सरकारने अफगाण कारागृहातून सोडवत देशात परत आणावे आणि नवीन जीवन जगण्यास मदत करावी अशी मागणी अनेक तथाकथित मानवतावादी संघटना आणि मुस्लिम संघटना करीत होत्या. मात्र पुन्हा भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि भारताचे अफगाण मधील रॉ चे अधिकारी जे या मुलींना भेटले होते, बोलले होते त्यांच्या विरोधामुळे भारत सरकारने या विषयी काहीही पावले उचलली नव्हती.


मात्र आता अफगाण मधील सत्ता तालिबानने हस्तगत केली आहे. सत्ता हस्तगत केल्यावर तालिबानने पहिले काम कोणते केले असेल तर, इसिस आणि अल कायदा या अतिरेकी संघटनेचे अफगाण कारागृहात असलेल्या जवळपास १० हजार अतिरेक्यांना मोकळे सोडण्याचे ! यात वेगवेगळ्या देशातून कट्टर इस्लामी संस्थांनी केलेल्या ब्रेन वॉश मुळे इसिस आणि अलकायदा या संघटनेत सहभागी झालेले तरुण आणि तरुणी पण आहेत. यात भारतात गाजत असलेल्या या आयेशा (सोनिया सेबीस्टिण ), राफीयेला, मरियाम (मेरिन जेकब ), फातिमा ईसा ( निमिषा ) या पोरींना पण सुटका मिळाली आहे.


आता पुन्हा या चारही पोरींनाचा वापर तालिबान आणि इस्लामिक संघटना कसा करतील यावर त्यांचे पुढील भवितव्य अवलंबून आहे. सोबतच इस्लामीस्ट लोकांना मांडीवर खेळवत आपले राजकारण साधणारी डावी इको सिस्टीम या मोकळ्या झालेल्या मुलींची मुलाखत घेत, गरीब घरच्या वाट चुकलेल्या, पाश्चातापात पोळलेल्या पोरी म्हणून सादर करत, सरकारवर त्यांना पुन्हा देशात वापस आणण्यासाठी दबाव तयार करतील. हीच पद्धत अमेरिका आणि युरोप मध्ये सरकारवर दबाव आणण्यासाठी वापरण्यात आली. अगदी हे प्रकरण त्यांनी न्यायालयापर्यंत पण नेले. मात्र ब्रिटन आणि अमेरिकेच्या न्यायालयाने या तरुण तरुणींना पुन्हा देशात प्रवेश द्यायचे सपशेल नाकारले. मात्र भारतातील इस्लामीस्ट आणि डावी इको सिस्टीम बघता भारतीय न्यायालये देश हितापेक्षा तथाकथित मानवतावादाच्या आहारी कधी आणि कशी जातील याचा भरवसा नाही.

तेव्हा आपणच जागृत राहून अश्या कोणत्याही तथाकथित मानवतावादी डाव हाणून पाडावा.

टिप्पण्या