सैन्य मोडीत काढा पासून सैन्याची गरज नाही पर्यंत!




"रबिश! टोटल रबिश! भारताला डिफेन्स प्लॅनची काहीही गरज नाही! "अहिंसा" हीच आपली पॉलिसी आहे. भारतासमोर कोणत्याही शत्रू-सैन्याचं संकट दिसत नाहीये. भारतीय सैन्य मोडीत काढा! आपल्या सुरक्षेसाठी पोलीस पुरेसे आहेत!" हे वाक्य कोण कोणाला म्हणाले माहीत आहे ? 


तर वाचा, स्वातंत्र्या नंतर, जेव्हा भारत आणि पाकिस्थानचे विभाजन झाले होते. काही संस्थानांवर भारत आणि पाकिस्थान आपला हक्क सांगत होते, परिस्थिती स्फोटक होती नेमके त्याच वेळी भारतीय सैन्याने धोरणात्मक मोर्चे बांधणी कुठे कुठे आणि कशी करावी आणि भारतीय सीमांच्या सुरक्षेसाठी धोरण नक्की काय ठेवावे या बद्दलची रणनीती बनवून ती जेव्हा तत्कालीन कमांडर इन चीफ लेफ्टनंट जनरल सर रॉबर्ट लॉकहार्ट यांनी तो दस्तावेज भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वरील वाक्य म्हंटले. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांना असे वाटत होते की भारतावर कोणीही हल्ला करणार नाही आणि भारताला कोणत्याही प्रकारे सैन्य शक्तीची गरज नाही. ते सैन्याला मोडीत काढायला निघाले होते. 


आभार मानायला हवे ते पाकिस्थानचे ज्यांनी काश्मीर वर हल्ला केला आणि भारतीय सैन्याला मोडीत काढायचा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मनसुबा धुळीला मिळाला. मात्र हे इथेच थांबले का ? तर नाही ! या नंतर पण आपल्या द्रष्ट्या पंतप्रधानांनी भारतीय सेनेला दुय्यम वागणूक दिली. भारताचे तत्कालीन गृहमंत्र्यांपासून थेट भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळे जेव्हा जवाहरलाल नेहरू यांना चीनच्या धोक्या पासून सावध करत होते, तेव्हा नेहरूंनी त्या कडे कानाडोळा तर केलाच पण सोबतच चीनी नेत्यांसोबत पंचशील करार करत शांतीची कबुतरे उडवीत बसले. भारत चीन मैत्रीचे अहिंसावादी स्वप्न बघत बसले. शेवटी १९६२ ला हे स्वप्न तुटले. १९५६ ते १९६२ चीन हळू हळू भारतीय प्रदेशाचे लचके तोडत होता आणि आपले पंतप्रधान शांतीची कबुतरे उडवीत होते. कारण नेहरूंना माहीत होते की त्यांचा पणतू त्यांच्यावरील हा कलंक पुसून काढणार ! 



२०२० मध्ये लडाख मधील गलावान येथे चिनी सैन्यासोबत भारतीय सैन्य भिडले. जवाहरलाल नेहरूंचा पणतू म्हणाला की चिनी सैन्य भारतीय सीमेत घुसले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चूक आहे किंवा आता अरुणाचल प्रदेश मध्ये चीन जवळपास साडे चार किलोमीटर आत आला त्याने गाव वसवले कारण नरेंद्र मोदी यांची चूक ! बघा नेहरूंवरचा कलंक त्यांचा पणतू राहुल गांधी पुसत आहे की नाही ? 


मग १९५६ ते १९६२ चीनने भारतीय भागाचे लचके तोडले ते कसे ? चीनला लागून असलेल्या लडाख भागाच्या बऱ्याच मोठ्या भारताच्या सीमेला आपण आंतरराष्ट्रीय सीमा न म्हणता LOC म्हणजे लाईन ऑफ अच्युअल कंट्रोल का बरे म्हणतो? याची उत्तरे मात्र राहुल गांधी यांच्या कडे नाही. ते का म्हणतो ते नरेंद्र मोदी यांना विचारायचे कारण ते आज पंतप्रधान आहेत याची उत्तरे देणे त्यांना बंधनकारक आहे. माझे काम आहे फक्त माझ्या पणजोबांच्या डोक्यावर असलेला कलंक पुसणे आणि तो विद्यमान सरकारच्या डोक्यावर फासणे बस ! 


अरुणाचल प्रदेशचा भाग ज्यावर राहुल गांधी आज ओरडत आहे त्या भागावर चीन १९५९ पासून कब्जा करून बसला आहे. बघा बरे जवाहरलाल नेहरू यांनी १९५४ साली केला होता पंचशील करार आणि तेव्हा पासून शांतीची कबुतरे उडवीत होते. बरे राहुल गांधी यांच्या वडिलांनी पण नक्की काय केले ?



१९८० मध्ये चीनने पुन्हा अरुणाचल प्रदेश मध्ये भारतीय सीमेचे लचके तोडले. लडाख मधील सीमा ठीक आहे वादात होती, अरुणाचल प्रदेशचे काय? तिथे तर मॅकमोहन लाईन आहे ना, आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून ? मग १९८० मध्ये चीन मॅकमोहन लाईन ओलांडून आत आला, लोंग्जु पासून माजा पर्यंत रस्ता बांधला तत्कालीन सरकार झोपले होते काय? तेव्हा हा भाग चीन कडून ताब्यात घ्यायचा प्रयत्न राजीव गांधी यांनी का केला नाही? कारण त्यांना माहीत हा कलंक आपला पोरगा मिटवणार ! आज राहुल गांधी दुसरे काय करत आहेत ? 


कॉंग्रेसच्या या सगळ्या नेत्यांनी देशांच्या सीमांचे खरेच रक्षण केले? जे भारतीय सेनेला मोडीत काढायला निघाले होते त्यांच्या कडून नक्की कोणत्या अपेक्षा ठेवायच्या देशाच्या सीमेच्या रक्षणाबाबत ? 


आज मात्र एक वर्तुळ पूर्ण झाले, जे काम आपल्या पणजोबांना जमले नाही ते काम करायचा निर्धार पणतुने केला आहे. आजच राहुल गांधी यांचा व्हिडीओ बघितला ते सांगत आहेत, "देशाला भारतीय भूदल, वायुदल आणि नौदलाची देशाच्या संरक्षणासाठी अजिबात गरज नाही. देशाचे संरक्षण करण्यास शेतकरी, कामगार पुरेसे आहेत." बघा दूरदृष्टी पणजोबांना वाटायचे की देशाच्या सुरक्षेसाठी फक्त पोलीस उपयोगाचे आहेत, पण त्यांच्या पणतुला तर पोलीस पण कामाचे वाटत नाहीत. 


कारण त्यांना माहीत आहे आज पर्यंत पाकिस्थान, चीनने देशाचे लचके तोडले तरी कळून पण जनतेला काही फरक पडला नाही आणि जेव्हा कळले तेव्हा त्याच्या मुळे कळले त्याच्यावर जवाबदारी ढकलली की कलंक मिटला. उद्या राहुल गांधी यांचा नातू-पणतु राहीलच की कलंक मिटवायला !

टिप्पण्या