![]() |
| कलकत्ता मेट्रो |
आपण बघितले की देशात पहिली मेट्रो रेल्वे १९८४ पासून कलकत्ता शहरात सुरू झाली असली तरी, मेट्रोची खरी महती आपल्याला २००४ नंतर दिल्ली मेट्रो रेल्वे मुळे कळली. वाढत्या शहरिकरणात शहराच्या अंतर्गत आणि शहराच्या बाहेरील परिघातील जनतेचा वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होणार हे सरकारला जाणवत होतेच. तत्कालीन आर्थिक परिस्थिती नुसार त्यावर मार्ग काढणे पण सुरू होते. पण या सगळ्यात मोठी भूमिका राजकीय इच्छाशक्ती आणि जगप्रसिद्ध भारतीय बाबूगिरी बजावत होते. तरीही MTP ने देशातील काही शहरांच्या वाहतुकीच्या संदर्भात केलेले सर्वेक्षण मात्र या वेळी कामात आले हे नक्की !
![]() |
| दिल्ली मेट्रो |
मग मेट्रो रेल्वे प्रायोजना आणण्यासाठी तेव्हा देशात गाजत असलेले PPP आणि BOT तत्वांकडे लक्ष दिले. पब्लिक प्रायव्हेट पार्टनर्शीप (PPP) आणि बांधा वापरा हस्तांतरित करा (BOT) ! शहरातील मेट्रो रेल्वे प्रायोजनेसाठी एक कंपनी उभारायची यात मोठी भूमिका स्थानीय स्वराज्य संस्थांची राहील, नंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यात भागीदार राहतील. सोबतच आर्थिक भार पूर्ण करण्यासाठी जागतिक स्तरावरील संस्थांकडून कर्ज काढण्याची परवानगी पण देण्यात आली, तसेच खाजगी उद्योजकांना पण या प्रकल्पात गुणवणूक करता येणार होती. म्हणजेच प्रकल्प तयार करण्याची, बांधण्याची आणि त्याला यशस्वीपणे राबवण्याची जवाबदारी ही स्थानीय स्वायत्त संस्थेच्या शिरावर आहे.
दुसरा प्रश्न उभा राहिला या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या मान्यतेचा. आज पर्यंत रेल्वेच्या तांत्रिक मान्यतेत भारतीय रेल्वेचा मोठा वाटा असायचा. याची सुरवात अगदी मेट्रो रेल्वेच्या पहिल्या अहवाला पासून व्हायची. याचा परिणाम म्हणून कलकत्ता मेट्रो आणि दिल्ली मेट्रो प्रकल्प देशातील इतर रेल्वे प्रकल्पाप्रमाणे ब्रॉड गेज मध्ये करावे असा दबाव बनविला होता. पण यात समस्या अशी होती की जगातील बहुसंख्य मेट्रो रेल्वे किंवा रेल्वे प्रकल्प हे मीटर गेज मध्ये आहेत. त्या मुळे मीटर गेज मधील मेट्रो रेल्वे प्रायोजना बनवतांना आर्थिकतेच्या दृष्टीने काहीसे स्वस्त पडतो. मग या करता केंद्र सरकारने तंत्रिकतेच्या सर्वेक्षणासाठी भारतीय रेल्वेबाह्य सर्वेक्षण अहवालाला मान्यता देणे मान्य केले. पण मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याच्या अगोदर करावे लागणारे सुरक्षा मानक सर्वेक्षण मात्र भारतीय रेल्वेच्याच हाती आहे. लक्षात घ्या अशी सुरक्षा सर्वेक्षण करणारी भारतीय रेल्वे जागतिक स्तरावर नावाजल्या गेली आहे.
जयपूर मेट्रो प्रकल्पाचे बांधकाम झाल्यावर तेथे एक नवीन समस्या समोर आली. राजकीय हस्तक्षेप झाल्याने जयपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या काही नियोजीत मार्गात बदल केल्या गेले, त्या मुळे अपेक्षित प्रवासी संख्या त्या प्रकल्पाला मिळत नव्हती. नंतर पुन्हा मार्ग वाढवत अपेक्षित प्रवासी मिळवण्यात यश आले. मात्र या अनुभवा वरून मार्ग निश्चिती करतांना त्या मार्गातून मिळणाऱ्या अंदाजित प्रवासी आणि उत्पन्न याचे गणित मांडणे किती आवश्यक आहे याचे महत्व पटले. मग या करता पण वेगळी बाह्य सर्वेक्षण संस्थेचा अहवाल आवश्यक केल्या गेला.
कोची मेट्रो रेल्वे प्रकल्प तांत्रिक आणि आर्थिक सगळ्या बाबतीत उत्तम असतांना पण या प्रकल्पाला आवश्यक प्रवासी संख्या गाठतांना दमछाक होत होती. तेव्हा या प्रकल्पाचा पुन्हा अभ्यास करतांना लक्षात आले की फक्त मेट्रो रेल्वे बांधून आणि सुरू करून प्रवासी मेट्रो रेल्वेला मिळणार नाही, त्या करता मेट्रो रेल्वे प्रकल्पाला प्रवाश्यांच्या दरवाज्या पर्यंत जावे लागेल. मग जगभरात मान्य झालेल्या आणि आपण आज पर्यंत विचार न केलेल्या इंटिग्रेट ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे कोची मेट्रो मध्ये प्रथम प्रयोग केल्या गेला. त्या नुसार प्रवाशाच्या घरा पासून मेट्रो रेल्वेच्या स्थानका पर्यंत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने वाहतूक साधने उपलब्ध केल्या गेली. यात पारंपरिक ऑटो रिक्षा, टॅक्सी सारख्या खाजगी भागीदारांसोबतच मेट्रो रेल्वेने तिथे बस आणि बोटी व्दारे प्रवासी सेवा सुरू करत प्रवाश्यांना आकर्षित केले. याच धर्तीवर मग भारतातील वेगवेगळ्या मेट्रो प्रकल्पाने आपल्या योजना आखणे सुरू करत प्रवाश्यांना आकर्षित करणे सुरू केले. दिल्ली मेट्रो प्रकल्पाने आपल्या स्थानकावर अल्प दरात सायकल आणि बॅटरी चलित दुचाकी उपलब्ध करून दिल्या, जेणे करून प्रवाश्यांना त्याचा वापर करत आपले काम करून पुन्हा स्थानकावर येता येईल. या करता IT क्षेत्राचीही मदत घेतल्या गेली.
तर मुंबई मेट्रो प्रकल्पाचे काम जागेचा अभाव आणि त्यावरील अतिक्रमणामुळे रखडले. अर्थात कामाला विलंब म्हणजे आर्थिक भुर्दंड. मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या चरणाच्या कामात कमालीचा वेळ लागला. या नंतर सरकारने पहिले प्रकल्पासाठीआवश्यक जमीन अवंटीत करून, मोकळी करून मगच तसा प्रस्ताव आणायची सक्ती सुरू केली.
एकूण काय ? तर येणाऱ्या वेगवेगळ्या समस्या आणि प्रसंग या तुन शिकत, समजत आणि त्याला यशस्वीपणे दोन हात करत भारतीय मेट्रो रेल्वे प्रकल्प आपली प्रगती करत आहे. असे नाही की प्रत्येक मेट्रो रेल्वे प्रकल्पात चूका झाल्यात काही प्रकल्प अत्यंत यशस्वी पण ठरले. जसे गुडगाव मेट्रो ही भारतातील कदाचित जगातील पहिली पूर्णपणे खाजगी उद्योगाने बांधली आणि संचालित केल्या गेली. आज तिला खाजगी संस्थेने दिल्ली मेट्रो रेलच्या ताब्यात दिली. त्या मुळे दिल्ली मेट्रो रेल्वे ब्रॉड गेज आणि मीटर गेज मेट्रो एकत्र संचालित करणारी एकमेव मेट्रो रेल्वे प्रकल्प ठरला आहे.
हैद्राबाद मेट्रो प्रकल्प हा जगातील सगळ्यात मोठा PPP तत्त्वावर उभारलेला मेट्रो प्रकल्प आहे. स्थानीय स्वराज्य संस्था, राज्य सरकार, केंद्र सरकार सोबत भारतातील एल अँड टी ही मोठी खाजगी संस्था या मेट्रो रेल्वे प्रकल्पत बरोबरीची भागीदार आहे. तर चेन्नई आणि बंगलोर मेट्रो रेल्वे प्रकल्प हा BOT तत्वावर उभारलेला देशातील यशस्वी मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे.
तर लखनऊ, अहमदाबाद आणि नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाने जलद गतीने बांधकाम करत कडक शिस्तीचे जागतिक मापदंड प्रस्थापित केले आहेत. इतकेच नाही तर नागपूर मेट्रो रेल्वेने कोची मेट्रो रेल्वे प्रकल्पातून प्रेरणा घेत हा मेट्रो प्रकल्प अधिका अधिक प्रदूषण मुक्त कसा करता येईल या करता प्रयत्न केले. यातून या मेट्रो प्रकल्पात रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर पॉवर आणि सांडपाणी पुनर्वापर सारख्या गोष्टींना प्राधान्य दिले. यातूनच नागपूर मेट्रो प्रकल्पाला परीचलनासाठी जी वीज लागणार आहे त्यातील ६०% वीज मेट्रो रेल्वे प्रकल्प याच सोलर पॉवर मधून मिळणार आहे, हे भारतातील बऱ्याच मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी प्रेरणादायी आहे आणि जागतिक स्तरावर पण कौतुकाचा विषय आहे.
या सगळ्या अनुभवातून मग साकार झाली ती "मेट्रो रेल्वे प्रकल्प नीती" ! २०१७ मध्ये केंद्र सरकारने आजवर आलेल्या अवरोधाचा विचार करत, वेळोवेळी केंद्र, राज्य सरकारने दिलेले निर्देश विचारात घेत एक मेट्रो रेल्वे प्रकल्प नीती बनविली. या पुढील देशातील प्रत्येक मेट्रो रेल्वे प्रकल्पाला या नीती अंतर्गतच आपली योजना तयार करायची आहे, तर आधीच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पांना या नीतीच्या अनुरोधाने आवश्यक पाऊले उचलायची आहेत.
आज भारतात
![]() |
२) हैद्राबाद मेट्रो - २०१२ पासून बांधकाम सुरू, २९ नोव्हेंबर २०१७ पासून सेवा प्रारंभ
३) लखनऊ मेट्रो - मार्च २०१४ पासून बांधकाम सुरू, ८ मार्च २०१९ पासून सेवेला सुरवात
४) मुंबई मेट्रो - जून २००६ बांधकाम सुरू, ८ जून २०१४ सेवा सुरू
या शहरात मेट्रो रेल्वेने आपली सेवा सुरू केली आहे. तर मुंबई (दुसरे चरण), पुणे, नवी मुंबई येथील मेट्रो रेल्वेचे बांधकाम आता अंतिम चरणाकडे जात आहे. तसेच पटना, इंदौर, भोपाळ, चंदीगड या शहरात लवकरच बांधकाम सुरू होणार आहे. कलकत्ता मेट्रो कात टाकत आता नवीन मेट्रो रेल्वे सोबत स्पर्धा करायचा प्रयत्न करत आहे. जिथे मेट्रो रेल्वे सेवा सुरू आहेत तिथे मेट्रो रेल्वेचे जाळे अधिक व्यापक करण्याचे काम पण जोमात सुरू आहे.
![]() |
| नवी मुंबई मेट्रो - सुरक्षा चाचण्या सुरु |
तरी भारत अजूनही जागतिक स्तरावर मेट्रो रेल्वे जाळ्याच्या बाबतीत अनेक योजने पाठी आहे. याला कारण आपली राजकारण आणि वादविवाद तयार करत अडवणूक करण्याची भारतीय पद्धत. थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या राज्यात मुंबई आणि पुणे येथे मेट्रो प्रकल्प आणायचे प्रयत्न जवळपास २००४ पासून सुरू आहेत. मात्र मुंबईत २००६ साली बांधकामास सुरवात होत २०१४ साली सेवा देण्यास सुरुवात करते तेही फक्त ३३ किलोमीटर मार्गावर ! . या काळात तर भारतातील इतर शहरात मेट्रो रेल्वे प्रकल्पात सेवा सुरू होत पुढील चरणाच्या कामाचे नियोजन पण झाले, मान्यता मिळाल्या तर काही शहरात काम पण सुरू झालीत. याचे कारण फक्त आणि फक्त राजकारण ! तर पुणे शहरात नियोजित मेट्रो पूर्ण भुयारी हवी की उन्नत यावर विनाकारण वाद ८-९ वर्षे घातल्या गेला आणि काम सुरू करण्यास उशीर झाला. या उलट नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प २०१४ साल पर्यंत तर कोणच्या स्वप्नात पण नव्हता. पण राजकीय इच्छा शक्तीने आणि शहरातील जनतेच्या भूमिकेमुळे नियोजित मार्गात किरकोळ बदल करत प्रकल्प बांधकाम २०१५ साली सुरू झाले, २०१९ साली नियोजित प्रकल्पातील एकूण दोन मार्गांच्या अर्ध्या अंतरावर आपली सेवा देण्यास सुरुवात पण केली आणि दुसऱ्या चरणाची मान्यता प्राप्त करत काही भागात त्याचे काम पण सुरू केले.
![]() |
| मोनो रेल |
![]() |
| लाईट रेल |
![]() |
| कलकत्ता मेट्रो पण कात टाकते आहे |










































टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा