चित्रपटसृष्टीचा "उडता पंजाब"

२०१६ साली एक चित्रपट प्रदर्शित झाला होता "उडता पंजाब" ! देशातील पंजाब राज्यातील तरुणांवर नशेचा चढता अंमल आणि त्यात पंजाब मधील पॉप गायक, राजकारणी आणि प्रशासनातील लोकांचा असलेला संबंध उघडपणे दाखवणारा हा चित्रपट होता. तत्कालीन पंजाब राज्य सरकार मधील सत्ताधारी स्थानीय पक्ष अकाली दल याने या चित्रपटाचा आणि चित्रपट ज्या वेळेस प्रदर्शित केल्या जात आहे त्या वेळेचा भरपूर विरोध केला होता. एकूणच हा चित्रपट पंजाब मधील जनतेचा अपमान करणारा, पंजाब मधील युवकांची चुकीची छवी देशासमोर आणणारा म्हणून तर विरोध होताच, मात्र ऐन राज्यातील निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित करत राज्यातील सत्ताधारी पक्षाची विशेषतः अकाली दलाची छवी या चित्रपटाच्या आड मलिन करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप केला जात होता.


तत्कालीन पंजाब राज्य सरकारमध्ये अकाली दला सोबत भाजप हा राष्ट्रीय पक्ष पण सत्तेत होता, आजही विरोधी पक्ष म्हणून बसतांना ही युती कायम आहे. विशेष म्हणजे पंजाब मधील काही भाजप नेत्यांनी अकाली दलाच्या आरोपाचे अनुमोदन केले असले तरी, राष्ट्रीय स्तरावर मात्र भाजपने या चित्रपटा विरोधात विशेष विरोध केला नव्हता. या वरून अकाली दल आणि भाजपा थोडे रुसवे फुगवे पण झाले होते.
मात्र केंद्रीय सेन्सर बोर्डाने चित्रपटातील काही संवाद आणि दृश्यावर आक्षेप घेतला होता. तर त्या आक्षेपाला जणू केंद्रीय सरकारने म्हणजेच भाजपनेच घ्यायला सांगितले आहे या आविर्भावात भारतीय चित्रपटसृष्टी विशेषतः मुंबई मधील तथाकथित वैचारिक कलाकार, दिगदर्शक यांनी होहल्ला करायला सुरुवात केली आणि ठेवणीतले "अभिव्यक्ती स्वातंत्र्यच्या गळचेपीचे" रडगाणे गायला सुरवात केली होती. सोबतीला भाजप विरोधी पक्ष पण सामील होतेच.

अर्थात हा चित्रपट त्याच्या निर्धारित तारखेलाच प्रदर्शित झाला, चंगला चालला पण ! पण हीच चित्रपट सृष्टी जेव्हा आपल्या कार्यक्षेत्रातील कळ्या जगतातील कृत्ये पडद्यावर येतात तेव्हा मात्र नाक मुरडते ! याच चित्रपटसृष्टीतील मराठमोळा मधूप भंडारकर जेव्हा पेज 3, फॅशन, कॅलेंडर गर्ल आणि हिरोईन सारखे चित्रपट बनवतो तेव्हा चित्रपटसृष्टीतील दुःखे विकतो म्हणत नाक मुरडली जातात.
चित्रपटसृष्टी आणि नशाबाजी याचा संबंध जुना आहे. संजय दत्त याची नशा तर जगप्रसिद्ध आहेच, पण नंतर पण अनेक अभिनेते आणि अभनेत्री या नशेत लिप्त असल्याचा आरोप सातत्याने झाला आहे. फरदीन खान याला तर रंगेहात पकडल्याच्या बातम्या वृत्तपत्रात येऊन गेल्या आहेत. तर एका विनोदी अभिनेत्याला आखाती देशातील विमानतळावर ड्रग्स सोबत पकडल्यामुळे खळबळ आणि त्याला तेथून सहीसलामत सोडवण्यासाठी झालेल्या पळापळीच्या सूरस कथा पण प्रसिद्ध आहेत. अर्थात ही उदाहरण म्हणून सांगितलेल्या कथा ! या पेक्षा जास्त कथा चित्रपट सृष्टीतील गॉसिप म्हणून बाजारात हिंडत आहे तर अनेक कथा या लपून बसल्या आहे.

असे म्हणतात पाण्यात तरंगणाऱ्या हिमनगाचा जितका भाग पाण्याच्या वर दिसतो, त्याच्या पेक्षा सातपट पाण्याच्या खाली असतो. चित्रपटसृष्टीची परिस्थिती पण काहीशी अशीच आहे. एखादा कलाकार पकडल्या गेला की नशे बद्दल थोडे बोलले जाते. "मी टू" सारख्या एखाद्या "हॅशटॅग" ने कोण्या अभिनेत्रीने कोणावर आरोप केले की चित्रपट सृष्टीतील लैंगिक अत्याचाराबद्दल, पिळवणुकी बद्दल, कास्टिंग काऊच बद्दल थोडे बोलले जाते, यातही जो पकडला गेला तो साव असा आव आणत बाकीचे मात्र आम्ही नाही त्यातलेचा अभिनय मात्र बेमालून वठवतात.
मात्र सध्याच्या सुशांतसिंग प्रकरण आणि या प्रकरणाचे झालेले राजकीय करण, सोबत याला मिळालेली प्रसिद्धी या मुळे या चित्रपटसृष्टीला आता आपल्या अस्तित्वाची चिंता वाटायला लागली आहे. सुशांतसिंग प्रकरणाचा तपास करता करता तपास यंत्रणेला रिया चक्रवर्तीच्या रूपाने चितपटसृष्टीतील काळ्या नशेच्या दुनियेचे घबाड हाती लागले आहे. त्यातच काही वृत्तवाहिन्या या तपासाचा क्षनंक्षण भारतीय प्रेक्षकांसमोर ठेवत आहे. यात महत्वाचे म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीत काम करणारे काही कलाकारच या विरोधात आवाज बुलंद करत आहेत. या सगळ्या प्रकाराने जागृत झालेले प्रेक्षक समाज माध्यमांवर या चित्रपटसृष्टी बद्दल, यातील काळ्या दुनिये बद्दल आपला रोष व्यक्त करीत आहे. हे असेच चालत राहिले तर लवकरच आपल्याला आपला गाशा गुंडाळावा लागेल हे आता या चित्रपटसृष्टीतील प्रस्थापितांना चांगलेच लक्षात आले आहे.

आज "गुडडी" म्हणजे जया अमिताभ बच्चन ज्या समाजवादी पक्षा तर्फे राज्य सभेत खासदार आहे, त्यांनी संसदेत या सगळ्या प्रकरणावर रोष व्यक्त केला आहे. आता तो रोष सुशांसिंग प्रकरण आणि रिया चक्रवर्ती ड्रग्स प्रकरणा विरोधात दाखवला का ? तर नाही ! ही प्रकरण गाजत असल्यापासून बच्चन कुटुंबीय या सगळ्यांच्या बाहेर आहे, या सगळ्या प्रकरणावर एकही प्रतिक्रिया कोणत्याही बच्चन कुटुंबाची नाही. अर्थात बच्चन कुटुंबीयांनी या प्रकरणावर भाष्य न करणे हा त्यांचा निर्णय आहे आणि ते प्रकरणावर काहीही बोलले नाही या बद्दल मला काहीही वाटत नाही.
खासदार म्हणून जया बच्चन यांनी या प्रकरणा विरोधात काही प्रतिक्रिया दिली काय? तर ते पण नाही ! मात्र संसदेत भाजपचे खासदार आणि संसद सदस्य तसेच प्रसिद्ध अभिनेते रवी किशन यांनी या प्रकरणावर सरकारने विशेष लक्ष देत तपास करावा आणि चित्रपटसृष्टीतील आणि देशातील जे लोक हा नशेचा बाजार करत आहे त्यांना पकडून योग्य कायदेशीत शासन करावे अशी मागणी केली. तेव्हा मात्र जया बच्चन यांना कंठ फुटला, हा सगळा प्रकार त्यांना चित्रपटसृष्टीची बदनामी करण्याचे षडयंत्र वाटले. या बद्दल राग व्यक्त करतानाच जया बच्चन यांनी चित्रपटसृष्टी किती लोकांना प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रोजगार देते, वर्षाला किती कर जमा करते याचे दाखले देत होत्या.

मात्र जयाजी हे विसरल्या की तुम्ही किती लोकांना रोजगार देता आणि किती कर भरता यामुळे तुम्हाला देशाचे कायदे मोडण्याचा अधिकार कोणी दिला आहे का? देशाच्या कायद्यात जी नशा बसत नाही अशी नशा करण्याचा अधिकार तुम्हाला दिला आहे का? काळा पैसा, दाऊद सारख्या देशद्रोही आणि गुंडा असलेल्या माणसाशी जवळीक, परीवारवाद, अंतर्गत गुंडागर्दी असे अनेक आरोप चित्रपटसृष्टीवर आज पर्यंत होत आले आहे. त्यामुळेच आता लोक चित्रपटसृष्टीला "गटार" म्हणत असतील तर ते जनतेचे "अभिव्यक्ती स्वातंत्र्य" नाही काय? खरे म्हणजे संसदेत खासदार म्हणून जवाबदरीने बसतांना देशाच्या कायद्या विरोधात वागणाऱ्या या लोकांविरोधात तपास लवकर संपवून चित्रपट सृष्टीला वाचवा असे जया बच्चन म्हणाल्या असत्या तरी काही फरक पडला नसता. पण आपल्या संसदेतील निवेदनाने जया बच्चन यांनी अप्रत्यक्षपणे कायदा मोडणाऱ्यांची बाजूच घेतली आहे, ही बाब मात्र गंभीर आहे. आता जया बच्चन यांच्या वक्तव्याला चित्रपट सृष्टीतून मोठ्या प्रमाणावर दुजोरा दिला जाणार हे स्पष्टच आहे.

मात्र जयाजी एक लक्षात घ्या गटार पूर्ण भरले असते तेव्हा त्याच्या वासाने लोक हैराण झाले असतात, तेव्हाच त्याचे झाकण ते रिकामे करण्यासाठी उघडले जाते, एक तर कमच्या, बांबू मारून पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल अशी सोय केल्या जाते किंवा घाण उपसायची मशीन आणून संपूर्ण घाण उपसल्या जाते तेव्हाच तिथे सगळ्यांना मोकळा श्वास घेता येतो.

टिप्पण्या


  1. जया बच्चन यांच्या राज्यसभेतील भाषणातून कळाले की या अमली पदार्थांची पाळेमुळे सिनेसृष्टीत किती खोलवर आहेत. मराठी चित्रपटसृष्टी पण यात मागे नक्कीच नसावी. कंगनाला विरोध करण्यासाठी ज्या हिरीरीने मराठी नटबोल्ट पुढे आले ते मुंबईचा अपमान झाला म्हणून नाही तर हेच कारण असावे असा संशयाला जागा आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा