भारताचे सातवे पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त दिल्ली येथील काँग्रेसच्या कार्यक्रमात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चालू राजकीय घडामोडी आणि नुकतीच काँग्रेसचे मोठे नेते माजी गृहमंत्री, वित्तमंत्री पद भूषविलेले पी. चितांबरम यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या भाषणात भाजप सरकार वर टीका केली.
अर्थात भारतातील जुना आणि सध्याचा मोठा विरोधी पक्षाच्या अध्यक्ष असल्यामुळे सरकारवर टीका करणे हा त्यांचा संवैधानिक हक्क आहे आणि तो त्यांनी बजावला, त्यात चिडण्यासारखे काही नाही. पण ही टीका करतांना सोनिया गांधी यांनी काही अतियोक्तीपूर्ण विधान केले, पण या मुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या त्या आई आहेत हे अजून एकदा सिद्ध झाले.
भाषण करतांना त्या म्हणाल्या," राजीव गांधी यांना १९८४ च्या निवडणुकीत जबरदस्त (कदाचित त्यांना पण "राक्षसी बहुमत" म्हणायचे असेल) बहुमत मिळाले तरी राजीव गांधी यांनी संविधान, न्यायालय आणि कायद्याचा नेहमी आदर केला, आणि त्या प्रमाणेच सरकार चालवले. देशात अजिबात "भय" चे वातावरण तयार केले नाही, जसे आज या देशात आहे."
असे विधान करतांना सोनिया गांधी यांनी काही चुकीचे विधान केले असे वाटत नाही. राजीव गांधी यांनी भ्रष्टाचार्यांना नक्कीच "भयाच्या" वातावरणात ठेवले नाही. उलट १०० पैशातील ९५ पैश्याचा हिशोब देत त्यांनी भष्टाचार्यांचा हिशोब अजून व्यवस्थित कसा होईल याचाच उदात्त विचार केला, शेवटी हिशोब लागणे महत्वाचे.
तसेही दिल्ली आणि देशातील शीख बांधवांवर केलेल्या अत्याचार आणि हे अत्याचार करणाऱ्यांना "जब बडा पेड गिरता है, तो धरती हिलती है।" म्हणत जो दिलासा दिला होता. तो बघून देशात नंतर तयार झालेल्या परिस्थितीचे "भय" वाटेनासे झाले. म्हणतात ना, "मेलेले कोंबडे आगीला भीत नाही." तसेच हे आधीच आगीत होरपळलेल्या जनतेला मग फुफाट्याची "भीती" तरी कशी वाटणार?
महागाई आणि डोलामय अर्थव्यवस्था सांभाळायला म्हणून आणलेले "झिरो बजेट" देशातील अनेक तरुणांच्या स्वप्नांची राखरांगोळी करून गेले, जाणीव तरी सोनिया गांधी यांना आहे का? तरी देशाची अर्थव्यवस्था काही देशाच्या तरुणांच्या स्वप्नांच्या राखेतून "फिनिक्स" प्रमाणे जिवंत होऊ शकली नाही.
संविधान आणि न्यायालयाचा सन्मान राजीव गांधी यांनी किती केला हे तर "शहाबानो प्रकरणात" दिसून आले. या प्रकरणात तर राजीव गांधी यांनी ना संविधानाची बुज राखली, ना न्यायपालिकेची! फक्त ऐकले ते एका धर्मांध झुंडीचे, वाकले एका धर्मांध झुंडी पुढे आणि देशाच्या सर्वोच्च संसदेला नाचवले ते आपल्या राक्षसी बहूमतानेच! इतकेच नाही तर या प्रकारामुळे आपल्या सरकार विरोधात जनता एकत्र येत आहे बघून राम जन्मभूमीचा शांत असलेला मुद्दा बाहेर काढत देशाच्या शांततेवर कायमची पाचर मारली. फक्त आपली सत्ता वचवायसाठीच!
सोनिया गांधी म्हणाल्या ते खोटे नाही राजीव गांधी यांच्या काळात नक्कीच "भयाचे वातावरण" नव्हते, पण कोणा साठी हे मात्र त्या सांगायचे विसरल्या! हे भयाचे वातावरण नव्हते युनियन कार्बाईडच्या अँडरसन करता. कारण भोपाळ मध्ये हजारो लोकांचे बळी घेऊन, लाखो लोकांना जन्मभरासाठी अपंग करून सुद्धा राजीव गांधी यांच्या पक्षाचा एक मुख्यमंत्री आपल्या स्वतःच्या गाडीने त्याला सुरक्षित विमानात बसवून देतो आणि आपल्याच देशातील जनतेचा विश्वासघात करतो. फक्त इतकेच नाही तर भोपाळच्या जनतेला "न्याय" मिळवून द्यायचे आमिष दाखवत याच युनियन कार्बाईड सोबत साटेलोटे करून भोपाळच्या जनतेला "न्याय" मिळू दिला नाही.
तरी राजीव गांधी संविधानाचा, न्यायालयाचा आणि कायद्याचा आदर करणारे म्हणे! का? तर सध्या एका भ्रष्टाचारी माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री याच्या बद्दल राजकीय सहानुभूती मिळवायसाठी?
काय आहे जनतेची समरणशक्ती कमी असते हे बरोबर, पण आजच्या आधुनिक 4G च्या जमान्यात इंटरनेटवर सगळं उपलब्ध आहे हे त्या विसरल्या, नाही तर कॉम्प्युटर आणि फोन भारतात सगळीकडे नेल्या बद्दल राजीव गांधी यांच्यावर पण टीका केली असती या बाईने.
😆👍👍
उत्तर द्याहटवा