"ताजमहाल" सांस्कृतिक वारसा कि ऐतिहासिक ??

                                       
(सदर लेख इन मराठी वेब पोर्टलवर प्रकाशित)

 मला नाही वाटत "ताज महाल" च्या वादाला काही अर्थ आहे....मुळात हा वाद फक्त "ताज महाल" कसा बांधला या वर आहे. खरा वाद वेगळाच आहे. तो हा कि "ताज महाल" भारताचा "सांस्कृतिक वारसा" आहे कि "ऐतिहासिक ठेवा". पण काही लोक याला भारताचा "सांस्कृतिक वारसा" म्हणतात आणि या वर वाद वाढतात.

                                        तिथे पहिले मंदिर असू शकते, पण मंदिर पाडून ताज महाल उभा केला असेल.....किंवा कुतुबमिनार सारखे मंदिराचे अवशेष वापरून....मंदिराला कबरी मध्ये इतक्या चांगल्याप्रकारे बदलू नाही शकत.

                                      हे खर आहे कि "पुष्कळ" लोक, ""अरबस्थान" वरून आलेले इथे येऊन अश्या इमारती कश्या बंधू शकतात?" असे "बाष्कळ" प्रश्न निर्माण करतात. पण "ताज महाल" बांधणारे बाहेरून आलेले नव्हते, इथले हिंदू कारागीर होते आणि मुस्लीम शासकाच्या कल्पनेला मूर्त रूप देणारे "हिंदूच" होते. तसेही मुघल आल्या नंतर "ताज महाल" खूप नंतर बांधण्यात आला त्या अगोदर लाल किल्ला, लाहोरचा किल्ला, फतेहपुर सिकरी, दिल्लीची जामा मस्जित, (थोडा काळ पुढे मागे झाला असेल) इत्यादी मोठ्या इमारतींचं बांधकाम मुघल आणि इतर मुस्लिम शासकांकडून झालेच होते की, हळू हळू शिकत असतातच.

                                  आज त्यांनी बुर्ज खलिफा बांधली, भारतात अजून बनली नाही म्हणजे भारतीय तशी इमारत बंधू शकत नाही असे नाही.....बगदाद शहर एकेकाळी मोठ्या आणि सुन्दर इमारतींसाठी प्रसिद्ध होते इतिहासात.

                                  आपण ज्याला "मुघल वास्तुशास्त्र" म्हणून ओळखतो ते फक्त इस्लाम कडून आलेले नसून त्याचे मूळ हे इकडे हिंदुस्थानातच आहे. ती इस्लामी कॅरीओग्रफी किवा नक्काशी आणि हिंदू वास्तुशास्त्र याचा अजोड मिलाफ आहे. इस्लाम आक्रमण भारतात येई पर्यंत हिंदू वास्तुकारांनी अनेक अजोड आणि आश्चर्यात टाकणार्या वास्तू बनविल्या आहेत. महाराष्ट्रातील "हेमाडपंथी" मंदिर याची साक्ष देऊ शकतात. फक्त दगड एकमेकांवर रचून किवा एकमेकात गुंतऊन कोणत्याही वेगळा जोडणी करणारा (उदा. चुना, चिक्कण माती) पदार्थ न वापरता हि सगळी मंदिर गेली हजारो वर्षे उभी आहेत. अगदी भूकंपात सुद्धा याचा दगड हलला नाही. त्या नंतर पण अनेक वास्तू अश्या आहेत ज्या आश्चर्यात टाकतात, कर्नाटकात एक मंदिर आहे ज्याच्या खांबां खालून कपडा आरपार जाऊ शकत, तमिळनाडू येथील गोपूर अनेक मजली आहेत, अप्रतिम सूर्यमंदिर हे सगळे हिंदू कारागीरानीच बनविले आहे.

                                  पण "ताज महाल" हिंदू कारागिरांनी बनवला म्हणून त्याला "सांस्कृतिक वारसा" म्हणता येणार नाही, कारण त्या कारागिराने ज्याच्या करता ती वास्तू बनवली त्याचा भारतीय संस्कृतीचा अर्थाअर्थी काही सबंध नव्हता, आणि त्यातून भारतीय संस्कृती चे दर्शन कुठेही होत नाही, त्यात प्रत्येक ठिकाणी ठशिव पणे इस्लामी संस्कृती आणि त्याचे महात्म्य समोर येते.

                              म्हणून तो एक "ऐतिहासिक ठेवा" होऊ शकतो पण "सांस्कृतिक वारसा" नाही.

                                  आजकाल "गंगा - जमुनी संस्कृती" असे म्हणतात आणि त्यात भारतीय संस्कृतीला बसवायच्या प्रयत्नांत "ताज महाल" पण "सांस्कृतिक वारसा" म्हणून मोठा करतात. हा प्रयत्न आजचा नाही , हा "हिदू - मुस्लीम ऐक्याच्या" स्वप्ना इतका जुना आहे. मात्र हा एकदम रद्दी प्रकार आहे, मुळातच "गंगा-जमुनी तहजीब" म्हणजे "हिंदू - मुस्लीम" मिलन नसून हिंदू आणि मुस्लीम यांनी जास्त संघर्ष न करता

                                    एकमेकांसोबत वागतांना पाळायचे अलिखित समज्यस्य पद्धत आहे, यात अर्थातच "मुस्लीम शासक" म्हणून त्यांना दिलेला जास्त मान, त्यांच्या मताला दिलेली जास्त किंमत आणि त्याच्या भाषेत केलेला व्यवहार हा प्रथम अधोरेकीत होतो. यात समानता, सहिष्णुता वगैरे भानगड नसून जिथे हिंदू संघर्ष जास्त आहे तो न लढता कमी कसा करता येईल हा विचार तिकडून, तर न मिळणारा मान मरतब न लढता मिळतोय हा इकडून असा विचार होता.

                                      म्हणूनच मी वर म्हणालो कि, "मुळात "ताज महाल" हा मुद्दाच नाहीये" तर मुळ मुद्दा हा आहे कि भारत हा हिंदू बहुल म्हणून "हिंदू छाप" जगावर उमटवायची कि "सेक्युलर राष्ट्र" म्हणून तीच "गंगा - जमुनी तहजीब" चे गोडवे गात मुस्लीम शासकांनी भारताचा "सांस्कृतिक उद्धार" केला हे समजायचं हे तुमच्या हातात आहे आणि मुख्य मुद्दा पण तोच आहे.
                                  
                                    आपल्या नशिबाने आपल्याला मिळालेले आधुनिक नेते या विचारला पूर्ण सामोरे कधी गेले नाही, त्या मागील कारण काही असो. त्याच मुळे भारताच्या बाहेर भारताची ओळख म्हणून फक्त ताजमहल, कुतुब मिनार, लाल किल्ला असल्या गोष्टी गेल्या. पण या गोष्टींच्या शेकडो वर्ष अगोदर बांधल्या गेलेल्या हम्पीची मंदिर, कोणार्कचे सूर्यमंदिर, अजंठा-वेरूळ, तामिलनाडूची अनेक मजली गोपूर असलेली मंदिर,अश्या अनेक "सांस्कृतिक वारसा" असलेली ठिकाण भारताची भारताबाहेरील ओळख झाल्या नाही.

टिप्पण्या